ऋषभ पंतने त्याच्या 101 रनच्या खेळीमधल्या पहिल्या 50 रन 82 बॉल खेळून केल्या, तर पुढच्या 50 रनसाठी त्याने फक्त 33 बॉल घेतले. मॅचमध्ये तुझी दोन रूपं दिसली, पहिल्यांदा तू सांभाळून खेळलास आणि मग आक्रमक बॅटिंग केलीस, असं रोहित म्हणाला. त्यावर उत्तर देताना, 'इंग्लंडवर आघाडी मिळवल्यानंतर माझी एकच रणनीती होती. बॉल बघून जर संधी असेल तर मोठा शॉट खेळायचा,' असं पंतने सांगितलं. ऋषभ पंत बॅटिंगला आला तेव्हा भारताची अवस्था 80 रनवर 4 बाद अशी झाली होती. पण त्याने रोहित शर्मा, अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदरसोबत पार्टनरशीप करत भारताला मोठी आघाडी मिळवून द्यायला मदत केली.Batting approach 👌 Vital partnership 👏 Fearless mindset 😎@RishabhPant17 & @Sundarwashi5 chat up with @ImRo45 after their fine batting show on Day 2 of the 4th Test in Ahmedabad.👍👍 - By @RajalArora @Paytm #INDvENG #TeamIndia
Full interview 🎥👉 https://t.co/gTGTV2Vhpn pic.twitter.com/mog1gOTD2N — BCCI (@BCCI) March 5, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Rishabh pant, Rohit sharma, Social media viral, Sports