जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : इंग्लंड सीरिजआधी विराटपुढे नवं संकट, कसा करणार सामना?

IND vs ENG : इंग्लंड सीरिजआधी विराटपुढे नवं संकट, कसा करणार सामना?

IND vs ENG : इंग्लंड सीरिजआधी विराटपुढे नवं संकट, कसा करणार सामना?

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाचा (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) 8 विकेटने पराभव झाला. यानंतर आता टीम इंडियाचं पुढचं लक्ष इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) 5 टेस्ट मॅचच्या सीरिजवर लागलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 29 जून : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाचा (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) 8 विकेटने पराभव झाला. यानंतर आता टीम इंडियाचं पुढचं लक्ष इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) 5 टेस्ट मॅचच्या सीरिजवर लागलं आहे. इंग्लंडमधलं वातावरण टीम इंडियासाठी सगळ्यात मोठं आव्हान आहे. यातच आता विराट कोहलीसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. इंग्लंडचा घातक फास्ट बॉल जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याने पुन्हा एकदा बॉलिंगला सुरुवात केली आहे. जोफ्रा आर्चर कोपराच्या शस्त्रक्रियेनंतर मैदानातून बाहेर होता, पण भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी त्याने बॉलिंगला सुरुवात केली आहे. या सीरिजसाठी फिट व्हायला आर्चरला आणखी महिन्याभराचा कालावधी आहे, कारण 4 ऑगस्टपासून नॉटिंघममध्ये भारत-इंग्लंड यांच्यातली पहिली टेस्ट होणार आहे. जोफ्रा आर्चरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सराव करतानाचा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो स्टम्प्सवर निशाणा साधत आहे. बराच काळ तो कोपराच्या दुखापतीने त्रस्त होता, यामुळे त्याला भारत दौराही अर्धवट सोडून इंग्लंडमध्ये परतावं लागलं होतं. आयपीएलमध्येही तो या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मार्च महिन्यात त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मे महिन्यात आर्चरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं, पण त्याच्या हाताची दुखापत कमी झाली नाही. 13 मे रोजी आर्चर ससेक्सकडून केंटविरुद्ध अखेरची मॅच खेळला होता. यात त्याने तीन विकेटही घेतल्या. भारताविरुद्ध अहमदाबादमध्ये झालेली टी-20 आर्चरची अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच होती. दुखापतीमुळे आर्चर 2020 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि यावर्षाच्या सुरुवातीला भारताविरुद्ध अनेक मॅच खेळू शकला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात