अहमदाबाद, 12 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये (India vs England) विराट कोहलीने (Virat Kohli) टॉसवेळीच इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनला (Eoin Morgan) धक्का दिला. रोहित शर्माशिवाय (Rohit Sharma) भारतीय टीम मैदानात उतरत असल्याचं विराटने सांगितलं. पहिल्या दोन मॅचसाठी रोहितला विश्रांती देण्यात आल्याचं विराट टॉसवेळी म्हणाला. रोहित टीममध्ये नसल्यामुळे राहुलसोबत शिखर धवन (Shikhar Dhawan) ओपनिंगला उतरेल. एकीकडे रोहित शर्मा या मॅचमध्ये खेळणार नसल्याचं विराट म्हणाला, पण मॅचच्या 24 तास आधी मात्र रोहित आणि राहुल ओपनिंगला खेळतील, असं विराट म्हणाला होता. ‘केएल राहुल आणि रोहित शर्मा सातत्याने ओपनिंगला चांगली कामगिरी करत आहेत. या दोघांपैकी कोणी विश्रांती घेतली तर शिखर धवन तिसरा ओपनर आहे. त्यामुळे रोहित आणि राहुलच ओपनिंग करतील,’ असं विराटने सांगितलं होतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितला दुखापत झालेली असताना राहुल आणि शिखर धवन ओपनिंगला खेळले होते. याआधी टी-20 आणि वनडेमध्ये राहुलवर विकेट कीपिंगची जबाबदारी होती. पण ऑस्ट्रेलिया आणि मग इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऋषभ पंतने धमाकेदार कामगिरी केली, त्यामुळे त्याला आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्येही संधी मिळाली आहे. पंत टीममध्ये आल्यामुळे केएल राहुलवरची विकेट कीपिंगची जबाबदारी कमी झाली आहे. भारतीय टीम केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.