कोलकाता, 21 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये 22 नोव्हेंबरला गुलाबी पर्वाची सुरुवात होणार आहे. हा सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे. त्यासाठी इडन गार्डन सध्या गुलाबी झालं आहे. भारताचा हा 540वा कसोटी सामना असणार आहे. या सामन्यासाठी चाहते सर्वात जास्त उत्सुक आहेत. दरम्यान, पहिला कसोटी सामना भारतानं 130 धावांनी जिंकला होता. सध्या भारतीय संघ डे-नाईट सामन्याची तयारी करत आहे. पारंपारिक सामन्यापेक्षा या सामन्याचे नियम वेगळे असणार आहेत. पारंपारिक कसोटी सामने हे लाल चेंडूवर खेळले जात असले तरी दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये वापरला जाणारा चेंडू मात्र गुलाबी रंगाचा असतो. रात्री प्रकाशझोतात चेंडू पटकन दिसावा म्हणून हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत कुकाबुरा या कंपनीचेच गुलाबी चेंडू वापरले गेले आहेत. इतर प्रथम श्रेणी क्रिकेट प्रमाणेच डे-नाईट टेस्टमध्ये 80 षटकानंतर नवा चेंडू घेता येतो. डे- नाईट कसोटी सामन्यांमध्येसुध्दा दिवसाला सहा तास आणि 90 षटकांच्या खेळाचे नियोजन असते. यात फॉलोऑन नचा नियम डे- नाईट कसोटीसाठी मात्र वेगळा आहे. पारंपरिक कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर 200 धावांची आघाडी असली तर फॉलोऑन देता येता. दिवस -रात्र सामन्यात हीच आघाडी 150 धावांची असली तरी फॉलोऑन देता येतो. वाचा- कोण आहे डे-नाईट कसोटीचा बादशहा; सामना पाहण्याआधी जाणून घ्या Records दरम्यान, या सामन्याची जय्यत तयारी बीसीसीआयच्या वतीनं करण्यात आली आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुध्दा उपस्थित असणार आहे. या सामन्याआधी इडन गार्डन मैदानावर गुलाबी रोषणाई करण्यात आली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाचा- शेवटच्या 15 चेंडूत असा जिंका सामना, धोनीनं सांगितलं सिक्रेट
वाचा- असं कोण आऊट होतं का? बघा क्रिकेटपटूला अतिआत्मविश्वास कसा नडला, VIDEO VIRAL आतापर्यंत 11 वेळा दिवस-रात्र सामना झाला आहे. मात्र भारतासाठी ही पहिली वेळ असणार आहे. असे असले तरी, डे-नाईट कसोटीमध्ये सर्वात यशस्वी ठरलेला संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया होय. ऑस्ट्रेलियानेच सर्वाधिक डे-नाईट सामने खेळले आहेत आणि त्यात त्यांची कामगिरी देखील शानदार आहे. क्रिकेटमधील पहिला डे-नाईट कसोटी सामना 27 नोव्हेंबर 2015 रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 विकेटने विजय मिळवला होता. डे-नाईटमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांचा देखील पराभव केला आहे. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ वेस्ट इंडिने 3 डे-नाईट कसोटी सामने खेळले आहेत. पण या तिन्ही सामन्यात त्यांचा पराभव झाला. इंग्लंडने डे-नाईट कसोटीमध्ये सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. त्यांनी ऑगस्ट 2017मध्ये वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 209 धावांनी पराभव केला होता.

)







