जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / शेवटच्या 15 चेंडूत असा जिंका सामना, धोनीनं सांगितलं सिक्रेट

शेवटच्या 15 चेंडूत असा जिंका सामना, धोनीनं सांगितलं सिक्रेट

शेवटच्या 15 चेंडूत असा जिंका सामना, धोनीनं सांगितलं सिक्रेट

धोनीनं युवा खेळाडूंना दिला गुरुमंत्र.

  • -MIN READ
  • Last Updated :

    हरियाणा, 20 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा जगातला सर्वश्रेष्ठ फिनीशर असून, त्यानं वन मॅन आर्मी बनत भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. मात्र गेले चार महिने धोनी क्रिकेटपासून लांब आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019मध्ये धोनीनं अंतिम सामना खेळला होता. त्यानंतर धोनी मैदानापासून दूर आहे. त्यामुळं सध्या भारतीय संघात धोनीच्या अनुपस्थित युवा खेळाडू ऋषभ पंत विकेटकीपरची भुमिका पार पाडत आहे. दरम्यान धोनी आता लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, धोनीचा उत्तराधिकारी म्हणून संघात असलेला पंत एकाही सामन्यात चांगली कामगिरी करू शकलेला नाही. पंतच्या बेजबाबदार खेळीमुळे टीका होत असताना धोनीनं पंतसारख्या युवा खेळाडूंना एक मोलाचा सल्ला आणि गुरुमंत्र दिला आहे. 38 वर्षीय धोनी हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात यशस्वी कर्णधआर आहे. दरम्यान धोनीनं आता मॅच फिनीशर होण्याचा एक मंत्र दिला आहे. हरियाणामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात धोनीनं शेवटच्या 15 चेंडूत सामना कसा जिंकावा हे सांगितले. वाचा- विराटला मोठा दणका; मॅच फिक्सिंग प्रकरणी क्राईम ब्रॅंच करणार चौकशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळं बऱ्याचदा कमी चेंडूत जास्त आव्हानाचा पाठलाग करत असताना धोनी मैदानात असतो. धोनीनं असे अनेक सामने जिंकत नाबाद खेळी केली आहे. धोनीची हीच खासियत त्यानं पहिल्यांदाच युवा खेळाडूंना सांगितली. वाचा- असं कोण आऊट होतं का? बघा क्रिकेटपटूला अतिआत्मविश्वास कसा नडला, VIDEO VIRAL ‘क्रिझवर जम बसवण्यासाठी जास्त कालावधी मिळत नाही’ हरियाणात झालेल्या एका कार्यक्रमात धोनीनं सामना कसा संपवायचा हे सांगितले. धोनीनं यावेळी, “अशा क्षणी प्रक्टिकल होण्यापेक्षा जिंकण्यासाठी काय करावे लागते, ते सर्व करायचे. तुम्ही जेव्हा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करता तेव्हा तुमच्यासमोर एकच लक्ष्य असते. तुम्हाला मैदानावर जम बसवण्यासाठी वेळ मिळत नाही. 15-20 चेंडूत तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागते”, असे सांगितले. तसेच, स्वत:चे उदाहरण देत, “मी जर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलो तर 15 चेंडूत 25-30 धावा करणे चांगले असेल. पण मी आक्रमक फलंदाजी करत मोठे शॉट उगाच मारले तर बाद होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कधी कधी परिस्थितीचा विचार करून फलंदाजी करावी”, असे म्हणाला. वाचा- IND vs WI : भारताला मिळणार नवा ओपनर, निवड समिती घेणार मोठा निर्णय ‘आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात विकेट गमवू नका’ हल्ली टी-20च्या जमाना असल्यामुळं सगळे खेळाडू हे आक्रमक फलंदाजी करण्यावर भर देतात. याबाबत सांगताना धोनीने, “आक्रमक फलंदाजी करताना गोलंदाजाला कधीच विकेट भेट म्हणून देऊ नका. प्रत्येक खेळाडूच्या मनात आपले असे एक लक्ष्य हवे. जर तुमची पध्दत बरोबर असेल तर तुम्हाला सफलता मिळतेच”, असेही सांगितले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात