लखनऊ, 12 नोव्हेंबर : कॅरेबियनचा दिग्गज अष्टपैलू फलंदाज कायरन पोलार्ड आपल्या मोठ्या मोठ्या लांबलचक षटकारांसाठी ओळखला जातो. मात्र अफगाणिस्तान विरोधात झालेल्या एकदिवसीय सामन्यात पोलार्डचं एक वेगळ रुप पाहायला मिळालं. या प्रसंगानं दर्शक आणि समालोचक सर्वच पोटधरून हसू लागले. वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पोलार्डनं आपल्या संघासाठी एक धाव वाचवली. 25व्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा फलंदाज 9 धावांवर फलंदाजी करत होता. यावेळी पोलार्डनं हातातून चेंडू सोडण्याआधीच पंचांनी हा चेंडू नो-बॉल घोषित केला. पंचांनी जोरात ओरडत नो-बॉल असे सांगितले. पोलार्डनं हे ऐकताच चेंडू न टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं पंचांना हा चेंडू डेड बॉल म्हणून जाहीर करावा लागला. रिप्लेमध्येही पोलार्ड क्रिझच्या बाहेर असल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र पंचांनी नो-बॉल जाहीर करताच त्यानं चेंडू न टाकण्याचा निर्णय घेतला. वाचा- असा गोलंदाज होणे नाही! 72 तासांत भारतीय गोलंदाजानं घेतली दुसरी हॅट्रिक
वाचा- शतकी खेळीनंतर ‘परफेक्ट’ फलंदाजाला पंचांनी दिला धोका, VIDEO पाहून व्हाल थक्क पोलार्डच्या अतिशहाणपणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा सलामी फलंदाज शाई होपनं शानदार शतकी खेळी केली. वेस्ट इंडिजनं अफगाणिस्तानला तिसऱ्या आणि चौथ्या एकदिवसीय सामन्यात नमवत पाच विकेटनं हरवत मालिका 3-0नं जिंकली. 2014नंतर पहिल्यांदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजनं विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजच्या एविन लेविस (1) आणि शिमरॉन हेटमायर (0) यांची विकेट गेल्यानंतर सर्वांच्या अपेक्षा या होपकडून होत्या. वाचा- भारतात चेंडूशी छेडछाड, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा 4 सेकंदाचा VIDEO VIRAL या सामन्यात होपला सामनावीराचा पुरस्कार देण्याता आला. त्यानं 145 सामन्यात 109 धावा केल्या. वेस्ट इंडिजनं 2014मध्ये बांगलादेश विरोधात अखेरचा सामना जिंकला होता. त्यानी बांगलादेशला क्लिन स्वीप दिला होता. वेस्ट इंडिज-अफगाणिस्तान यांच्यात भारतात लखनऊमध्ये मालिका होत आहे.

)







