सिडनी, 27 नोव्हेंबर : भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील महासंग्रामाला आजपासून सुरूवात होणार आहे. थोड्याच वेळात दोन्ही संघांमध्ये टॉस होईल, मात्र त्याआधीच भारतीय संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयनं भारतीय संघात टी. नटराजनला (T Natrajan) सामिल केले आहे. नटराजनला नवदीप सैनीचा (Navdeep Saini) रिझर्व्ह खेळाडू म्हणून संघात घेतले आहेत. आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात नटराजन याने त्याच्या यॉर्करने दिग्गज बॅट्समनची भंबेरी उडवली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. बुधवारी नटराजन याने सोशल मीडियावर त्याचा टीम इंडियाची जर्सी घातलेला फोटो शेयर केला. नटराजन याचा हा फोटो देशासाठी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न बघणाऱ्या कोट्यवधी तरुणांसाठी आशेचा किरण आहे. टी नटराजनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याच्या शक्यता कमी असल्या तरी, त्याच्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवणं ही मोठी बाब असेल. वाचा- IND vs AUS : आईने मजुरी करून वाढवलं, आता मिळाली टीम इंडियाची जर्सी, खेळाडू भावुक
NEWS - T Natarajan added to India’s ODI squad
— BCCI (@BCCI) November 26, 2020
The All-India Senior Selection Committee has added T Natarajan to India’s squad for three-match ODI series against Australia starting Friday.
Updates on Rohit Sharma and Ishant Sharma's fitness here - https://t.co/GIX8jgnHvI pic.twitter.com/VuDlKIpRcL
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात नटराजन याने त्याच्या यॉर्करने दिग्गज बॅट्समनची भंबेरी उडवली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. बुधवारी नटराजन याने सोशल मीडियावर त्याचा टीम इंडियाची जर्सी घातलेला फोटो शेयर केला. नटराजन याचा हा फोटो देशासाठी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न बघणाऱ्या कोट्यवधी तरुणांसाठी आशेचा किरण आहे. वाचा- India vs Australia : टॉसआधीच टीम इंडियाला झटका, इशांत शर्मा ऑस्ट्रेलिया दौर्याबाहेर; तर रोहित… मोल मजुरी करायची आई नटराजनने आयपीएलमध्ये नाव कमावून टीम इंडियामध्ये प्रवेश केला असला तरी त्याचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये नटराजन लहानाचा मोठा झाला. त्याचा जन्म तामिळनाडूच्या चिन्नापाम्पट्टी गावात झाला होता. नटराजनची आई मोल मजुरी करत होती. नटराजन हा सुरुवातीला टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचा. त्यावेळी त्याचे बॉलिंग प्रशिक्षक जयप्रकाश यांनी नटराजनची प्रतिभा ओळखली आणि त्याला तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी दिली. इकडेच नटराजनचं नशीब बदललं. तामिळनाडूकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नटराजन याने 9 मॅचमध्ये 27 विकेट घेतल्या आहेत. 2017 साली नटराजनला पंजाब (KXIP) ने तीन कोटी रुपयांना विकत घेतलं, पण पुढच्या मोसमासाठी त्याला टीममध्ये ठेवलं नाही. अखेर हैदराबादने 40 लाख रुपयांमध्ये नटराजनला टीममध्ये घेतलं. हैदराबादला या मोसमात प्ले-ऑफमध्ये पोहोचवण्यात नटराजनने मोलाची भूमिका बजावली.