Home /News /sport /

IND vs IRE : आयपीएल जिंकल्याचं बक्षीस, हार्दिक पांड्या टीम इंडियाचा नवा कॅप्टन!

IND vs IRE : आयपीएल जिंकल्याचं बक्षीस, हार्दिक पांड्या टीम इंडियाचा नवा कॅप्टन!

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची (India tour of Ireland) घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) विजय मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 जून : आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची (India tour of Ireland) घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) विजय मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली आहे. 26 जून आणि 28 जूनला भारत आणि आयर्लंड यांच्यात 2 टी-20 मॅच खेळवल्या जाणार आहेत. या काळात टीम इंडियाचे सीनियर खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत, त्यामुळे युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी संजू सॅमसन (Sanju Samson) आणि सूर्यकुमार यादवचं (Suryakumar Yadav) टीममध्ये कमबॅक झालं आहे, तर आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मॅचची सीरिज खेळत आहे. या सीरिजमध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. हे तिन्ही खेळाडू उद्या इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होतील, तर ऋषभ पंत, श्रेयस अय्यर 19 तारखेला सीरिज संपल्यानंतर इंग्लंडला रवाना होतील. दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी केएल राहुलला टीमचं कर्णधार करण्यात आलं होतं, पण दुखापत झाल्यामुळे तो या सीरिजमध्ये खेळू शकला नाही. इंग्लंड दौऱ्यावरही राहुल जाईल का नाही, याबाबत साशंकता आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Hardik pandya, Team india

    पुढील बातम्या