मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : बदला घेण्यासाठी इंग्लंड खेळेल मोठी चाल, गावसकरांचा इशारा

IND vs ENG : बदला घेण्यासाठी इंग्लंड खेळेल मोठी चाल, गावसकरांचा इशारा

महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला (India vs England) धोक्याचा इशारा दिला आहे.

महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला (India vs England) धोक्याचा इशारा दिला आहे.

महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला (India vs England) धोक्याचा इशारा दिला आहे.

मुंबई, 30 मे : महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला (India vs England) धोक्याचा इशारा दिला आहे. भारताविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी इंग्लंड हिरवी खेळपट्टी तयार करेल, असं गावसकर म्हणाले आहेत. यावर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर आली होती, तेव्हा इंग्लंडच्या टीमने भारतातल्या खेळपट्टीवर आक्षेप घेतले होते, त्यामुळे आता इंग्लंडने आता खेळपट्टीवर गवत ठेवलं तर मला आश्चर्य वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली.

सुनिल गावसकर यांनी टेलिग्राफमध्ये एक लेख लिहिला आहे. 'भारतीय खेळपट्टीबाबत इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे भारतालाही इंग्लंडमध्ये फास्ट बॉलिंगसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर खेळावं लागू शकतं, पण भारतासाठी या गोष्टी अजिबात अडचणीच्या नाहीत. कारण भारताकडे असलेली फास्ट बॉलिंग या खेळपट्ट्यांवर उपयुक्त ठरेल, उलट इंग्लंडच्याच बॅट्समनना हिरवी खेळपट्टी अडचणीची ठरू शकते,' असं गावसकर म्हणाले.

गावसकरांनी इंग्लंड दौऱ्यात भारताच्या विजयाचं भाकीत केलं आहे. भारतीय टीम किती फरकाने जिंकेल, हे त्यांनी सांगितलं नाही. पण भारताकडे इतिहास घडवण्याची चांगली संधी आहे, असं गावसकरांना वाटतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी टीम इंडियाला सरावासाठी 6 आठवड्यांचा वेळ मिळणार आहे. टीमसाठी सराव करायला आणि वातावरणाशी एकरूप व्हायला एवढा कालावधी भरपूर आहे.

इंग्लंडची टीम यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर आली होती. दोन्ही टीममध्ये 4 टेस्ट, 5 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज झाली होती. इंग्लंडने चेन्नईमध्ये झालेली पहिली टेस्ट मॅच जिंकली, यानंतर उरलेल्या तिन्ही टेस्टमध्ये भारताचा विजय झाला. त्यावेळी इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी आणि माजी क्रिकेटपटूंनी भारताने स्पिनरना अनुकूल अशी खेळपट्टी बनवल्यामुळे टीका केली होती.

First published:

Tags: Cricket, India vs england, Sunil gavaskar, Team india