मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Womens Asia Cup: टीम इंडियाची वुमन्स ब्रिगेड फायनलमध्ये, पाहा कधी आणि कुणाविरुद्ध होणार मेगा फायनल?

Womens Asia Cup: टीम इंडियाची वुमन्स ब्रिगेड फायनलमध्ये, पाहा कधी आणि कुणाविरुद्ध होणार मेगा फायनल?

टीम इंडियाची वुमन्स ब्रिगेड आशिया कपच्या फायनलमध्ये

टीम इंडियाची वुमन्स ब्रिगेड आशिया कपच्या फायनलमध्ये

Womens Asia Cup: महिला आशिया कपच्या इतिहासात भारतीय संघानं आजवर प्रत्येक स्पर्धेत फायनल गाठली आहे. यंदाची ही आठवी वेळ ठरली. त्यामुळे आता येत्या शनिवारी भारतीय संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

सिल्हेट-बांगलादेश, 13 ऑक्टोबर: दुबईत झालेल्या पुरुषांच्या आशिया कपमध्ये टीम इंडियाला सुपर फोर फेरीमधूनच गाशा गुंडाळावा लागला. पण बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या महिलांच्या आशिया कपमध्ये मात्र हरमनप्रीत कौरच्या वुमन्स ब्रिगेडनं कमाल केली. सहा वेळा आशिया कप जिंकलेल्या भारतीय संघानं आज झालेल्या सेमी फायनलमध्ये थायलंडवर निर्विवाद वर्चस्व गाजवून फायनलमध्ये धडक मारली आहे. महिला आशिया कपच्या इतिहासात भारतीय संघानं आजवर प्रत्येक स्पर्धेत फायनल गाठली आहे. यंदाची ही आठवी वेळ ठरली. त्यामुळे आता येत्या शनिवारी भारतीय संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. त्यावेळी टीम इंडियासमोर आव्हान असेल ते श्रीलंकेचं.

थायलंडचा पुन्हा धुव्वा

साखळी फेरीत गतविजेत्या बांगलादेश आणि पाकिस्तानला हरवून थायलंडच्या महिलांनी सेमी फायनल गाठली होती. पण साखळी फेरीत आणि सेमी फायनलमध्ये टीम इंडियाकडून मात्र थायलंडला मोठा पराभव स्वीकारावा लागला. आज सकाळी झालेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये शफाली वर्मा (42) आणि हरमनप्रीत कौर (36) यांच्या दमदार खेळीमुळे भारतानं 148 धावा स्कोअरबोर्डवर लावल्या. पण फॉर्मात असलेली दिप्ती शर्मा आणि इतर बॉलर्ससमोर थायलंडला 20 ओव्हरमध्ये 9 बाद 74 धावांचीच मजल मारता आली. भारतानं हा सामना 74 धावांनी जिंकला. दिप्तीनं 3 तर राजेश्वरी गायकवाडनं 2 विकेट्स घेतल्या.

रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेचा विजय

दरम्यान श्रीलंका आणि पाकिस्तान संघातला दुसरा सामना चांगलाच रंगला. या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव करत फायनल गाठली. श्रीलंकेनं दिलल्या 123 धावांचा पाठलाग करताना पाकिस्ताननं 19 व्या ओव्हरपर्यंत 6 बाद 114 धावांची मजल मारली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 9 धावा हव्या असताना पाकिस्तानची ऑल राऊंडर निदा दार पीचवर होती. त्यामुळे पाकिस्तान जिंकेल अशी परिस्थिती होती. पण अखेर श्रीलंकेनं अवघ्या एका रन्सनं बाजी मारली. त्यामुळे आता शनिवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. महत्वाची बाब म्हणजे यंदाच्या आशिया कपममध्ये साखळी सामन्यात भारतानं श्रीलंकेला मात देत स्पर्धेची विजयी सुरुवात केली होती. दरम्यान श्रीलंकेनं फायनल गाठण्याची ही आजवरची पाचवी वेळ ठरली आहे. पण आजवर एकदाही श्रीलंकेनं विजेतेपद पटकावलेलं नाही.

हेही वाचा - T20 World Cup: टी20 वर्ल्ड कपआधी पाहा टीम इंडियाची काय झाली परिस्थिती? या ज्युनियर संघाचा भारताला दणका

भारत वि. श्रीलंका, महिला आशिया कप फायनल

शनिवार, 15 ऑक्टोबर: दुपारी 1.00 वाजता

सिल्हेट आंतरराष्ट्रीय स्टेडियम, बांगलादेश

First published:

Tags: Sports, T20 cricket, Women's cricket Asia Cup