मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /दोन महिन्यात दोनदा भारत-पाकिस्तान महामुकाबला... चाहत्यांनो लक्षात ठेवा या तारखा!

दोन महिन्यात दोनदा भारत-पाकिस्तान महामुकाबला... चाहत्यांनो लक्षात ठेवा या तारखा!

दोन महिन्यात दोनदा भारत-पाकिस्तान महामुकाबला... चाहत्यांनो लक्षात ठेवा या तारखा!

दोन महिन्यात दोनदा भारत-पाकिस्तान महामुकाबला... चाहत्यांनो लक्षात ठेवा या तारखा!

Asia Cup 2022 - आशिया चषकाच्या एक महिन्यानंतर ऑस्ट्रेलियात आयसीसी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे विश्वचषकाच्या मैदानातही पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामन्याची मेजवानी चाहत्यांना मिळणार आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Indian Telephone Industry

मुंबई, 02 ऑगस्ट : भारत आणि पाकिस्तान... क्रिकेटच्या मैदानातले हे पारंपरिक प्रतिस्पर्धी. आणि ज्यावेळी हे दोन्ही संघ आमनेसामने येतात तेव्हा मैदानातच नव्हे तर दोन्ही देशात वेगळं वातावरण पाहायला मिळतं. तो योग पुन्हा एकदा जुळून आलाय आणि तोही एकदा नव्हे तर दोन वेळा. त्यासाठी निमित्त आहे ते आगामी आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेन्टी ट्वेन्टीचा विश्वचषक.

एशियन क्रिकेट काऊन्सिलनं आशिया चषकाचं संपूर्ण वेळापत्रक नुकतंच जाहीर केलंय. तब्बल चार वर्षानंतर होणारी ही स्पर्धा 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यानं यूएईत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आणि महत्वाची बाब ही की भारताचा सलामीचा सामना रंगणार आहे तो पाकिस्तानशी. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 28 ऑगस्टच्या संध्याकाळी ही लढत होणार आहे.

यंदाच्या आशिया चषकाचं आयोजन आधी श्रीलंकेत करण्यात आलं होतं. पण श्रीलंकेतल्या अस्थिर वातावरणामुळे एसीसीनं पुन्हा एकदा ही स्पर्धा यूएईत खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शारजाह आणि दुबईत या स्पर्धचे सर्व सामने पार पडणार आहेत. हे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सुरु होतील.

हेही वाचा - Asia Cup 2022 च्या वेळापत्रकाची घोषणा, या दिवशी होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला

ऑस्ट्रेलियातही भारत-पाक महामुकाबला:

दुसरीकडे आशिया चषकाच्या एक महिन्यानंतर ऑस्ट्रेलियात आयसीसी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे विश्वचषकाच्या मैदानातही पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामन्याची मेजवानी चाहत्यांना मिळणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.

आशिया चषकासाठी भारतीय संघनिवड लवकरच:

आशिया चषकासाठी आपापले संघ जाहीर करण्यासाठी एसीसीनं सहभागी देशांना ८ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजमध्ये ट्वेन्टी ट्वेन्टी मालिका खेळत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना सात ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंची या मालिकेतील कामगिरी पाहून त्याच दिवशी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे.

First published:

Tags: India, India vs Pakistan, T20 cricket