मुंबई, 22 जानेवारी : पुढील महिन्यात वेस्ट इंडीज टीम (India vs West Indies) भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. वेस्ट इंडिज आणि भारतादरम्यान तीन वनडे आणि 3 टी 20 सामने खेळणार आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे हे सामने अहमदाबाद आणि कोलकात्यात खेळवले जाणार आहे.
बीसीसीआयने वेस्ट इंडिज आणि भारत सीरिजबद्दल वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. वनडे मालिका अहमदबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (narendra modi cricket stadium) खेळवले जाणार आहे. तर टी20 सीरीज कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळवले जाणार आहे. वेस्ट इंडिज टीम १ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये दाखल होणार आहे.
NEWS 🚨 : BCCI announces revised venues for home series against West Indies. The three ODIs will now be played at the Narendra Modi Stadium, Ahmedabad and three T20Is will be held at the Eden Gardens, Kolkata. More details here - https://t.co/vH9SOhtpIS #INDvWI pic.twitter.com/KNEZ8swbVa
— BCCI (@BCCI) January 22, 2022
त्यानंतर पुढील ३ दिवस विंडीज टीम आयसोलेशनमध्ये राहणार आहे. भारतीय टीम सध्या दक्षिण आफ्रिकेच्या (India vs South Africa) दौऱ्यावर आहे. रविवारी अखेरचा सामना खेळून टीम परत येणार आहे.
असं आहे भारत Vs वेस्ट इंडीज वेळापत्रक
6 फेब्रुवारी - पहिली वनडे, अहमदाबाद
9 फेब्रुवारी - दुसरी वनडे, अहमदाबाद
11 फेब्रुवारी - तिसरा वनडे, अहमदाबाद
भारत-वेस्टइंडीज टी20 सीरिज
16 फेब्रुवारी - पहिला टी20, कोलकाता
18 फेब्रुवारी - दुसरी टी20, कोलकाता
20 फेब्रुवारी - तिसरा टी20, कोलकाता
वेस्टइंडीजसोबत सीरिज खेळल्यानंतर श्रीलंकेची टीम सुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्यात (India vs Sri lanka) भारतात येणार आहे. या दरम्यान तीन टी20 सामने आणि 2 टेस्ट सामने खेळवले जाणार आहे.
श्रीलंकेविरोधात भारताचा पहिला टेस्ट सामना हा बंगळुरूमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ही टेस्ट विराट कोहलीसाठी 100 सामना ठरणार आहे. कोहलीने आतापर्यंत 99 टेस्ट सामने खेळले आहे. तर दुसरी टेस्ट मॅच मोहालीमध्ये खेळणार आहे. त्यानंतर पहिला टी20 सामना मोहाली, दुसरा टी20 धर्मशाला आणि शेवटचा टी20 मॅच लखनऊमध्ये खेळवण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmedabad