कोलकाता, 18 फेब्रुवारी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने (India vs West Indies 2nd T20) 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 186 रन केले. विराट कोहली (Virat Kohli) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांची अर्धशतक तर व्यंकटेश अय्यरच्या (Venkatesh Iyer) आक्रमक बॅटिंगमुळे भारताला या स्कोअरपर्यंत पोहोचता आलं. पंतने 28 बॉलमध्ये नाबाद 52 रन केले, तर विराट 41 बॉलमध्ये 52 रनवर आऊट झाला. व्यंकटेश अय्यरने 18 बॉलमध्ये 33 रन केले. भारताच्या 5 पैकी 3 विकेट ऑफ स्पिनर रोस्टन चेसने (Roston Chase) घेतल्या. चेसने पहिले रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि मग विराट कोहलीची विकेट घेतली. चेसने रोहितला 19 रनवर ब्रॅण्डन किंगकडून कॅच आऊट केलं. यानंतर त्याने सूर्यकुमार यादवला 8 रनवर आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं. विराटला चेसने 52 रनवर बोल्ड केलं. रोस्टन चेसने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 3 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये (IPL 2022) विराट कोहलीला आरसीबीने (RCB) 15 कोटी रुपयांना, रोहित शर्माला मुंबईने (Mumbai Indians) 16 कोटी रुपयांना तर सूर्यकुमार यादवला मुंबईनेच 8 कोटी रुपयांना रिटेन केलं. आयपीएलमधल्या या 39 कोटी रुपयांच्या दिग्गजांना रोस्टन चेसने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, पण रोस्टन चेस मागच्या आठवड्यात झालेल्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला. कोणत्याच टीमने चेसवर बोली लावली नाही. भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्येही रोस्टन चेसने उल्लेखनीय कामगिरी केली होती. 4 ओव्हरमध्ये 14 रन देऊन चेसने 2 विकेट घेतल्या होत्या. चेसने पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि इशान किशन या दोन भारतीय ओपनरना माघारी पाठवलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.