कोलंबो, 30 जुलै: श्रीलंकेतून भारतीय टीमबाबत एक महत्त्वाचं अपडेट समोर येत आहे. आणखी दोन महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण (2 Players of Indian Cricket Team tested Corona Positive) झाली आहे. सीनिअर लेगस्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि स्पीन बॉलिंग ऑलराउंडर के गौतम (K Gowtham) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कृणाल पांड्या (Krunal Pandya Tested Corona Positive) 27 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून येण्यापूर्वी जे 8 खेळाडू त्याच्या संपर्कात आले होते, त्यापैकी दोन खेळाडू युझवेंद्र आणि गौतम हे आहेत. यामुळे आता चहल आणि गौतमला कृणालसह कोलंबोमध्येच काही काळासाठी राहावं लागणार आहे.
COVID-19: Yuzvendra Chahal and K Gowtham test positive in Sri Lanka
Read @ANI Story | https://t.co/1wL0NKVvEF#YuzvendraChahal #KGowtham #Cricket pic.twitter.com/vqmUKzYA67 — ANI Digital (@ani_digital) July 30, 2021
दरम्यान चहल आणि गौतम यांना कोलंबोमध्ये राहावं लागणार आहे. तर इतर क्रिकेटपटू ज्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती- हार्दिक पांड्या, मनिष पांडे, दीपक चहर, इशान किशन हे बाकीच्या भारतीय संघासह भारतात परतणार आहेत. शुक्रवारी ते भारतात परततील.
कृणालच्या संपर्कात आलेले इतर दोन खेळाडू-पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव (Prithvi Shaw and Suryakumar Yadav) हे देखील कोलंबोमध्येच थांबणार आहेत, ते भारतात येण्यासाठी रवाना होणार नाहीत. शॉ आणि सूर्या कोलंबोमधूनच इंग्लंडसाठी रवाना होतील.
हे वाचा-हसरंगानं वाढदिवशी दिली टीम इंडियाला मोठी जखम, 'ही' कामगिरी करणारा पहिलाच बॉलर
मिळालेल्या माहितीनुसार गौतम आणि चहलची कोरोना टेस्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आली आहे. त्यापूर्वी गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी इतर सहा जणांप्रमाणेच नकारात्मक आली होती. कृणालच्या रॅपिड अँटिजेन आणि आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्या सकारात्मक आल्यानंतर त्यांला आयसोलेटशनमध्ये हलवण्यात आलं होतं. तर इतर आठ जणं ज्यांची चाचणी करण्यात आली होती, त्यांना हॉटेलमध्येच इतर टीमपासून वेगळं ठेवण्यात आलं होतं. ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, कृणाल, चहल आणि गौतमला साधारण एक आठवडाभर तरी कोलंबो आयसोलेशन फॅसिलीटमध्ये राहावं लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona