मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND VS SL : तिसऱ्या टी २० सामन्यात कोणाचं पारडं राहणार जड? कधी, कुठे पहाल सामना?

IND VS SL : तिसऱ्या टी २० सामन्यात कोणाचं पारडं राहणार जड? कधी, कुठे पहाल सामना?

 शनिवारी 7 जानेवारी रोजी राजकोट येथे मालिकेतील तिसरा सामना आयोजित केला गेला असून हा सामना जिंकणारा संघ मालिका विजयासाठी पात्र ठरेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना 'करो या मरो' चा ठरणार आहे.

शनिवारी 7 जानेवारी रोजी राजकोट येथे मालिकेतील तिसरा सामना आयोजित केला गेला असून हा सामना जिंकणारा संघ मालिका विजयासाठी पात्र ठरेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना 'करो या मरो' चा ठरणार आहे.

शनिवारी 7 जानेवारी रोजी राजकोट येथे मालिकेतील तिसरा सामना आयोजित केला गेला असून हा सामना जिंकणारा संघ मालिका विजयासाठी पात्र ठरेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना 'करो या मरो' चा ठरणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 7 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या टी 20 मालिकेत आज निर्णायक सामना पारपडणार आहे.  शनिवारी 7 जानेवारी रोजी राजकोट येथे मालिकेतील तिसरा सामना आयोजित केला गेला असून हा सामना जिंकणारा संघ मालिका विजयासाठी पात्र ठरेल. भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. तर गुरुवारी पुण्यात झालेला दुसरा सामना श्रीलंकेने जिंकून  मालिकेत भारताशी 1-1 अशी बरोबरी साधली. आज होणाऱ्या तिसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेपेक्षा भारताचं पारडं अधिक जड राहण्याची शक्यता आहे. मात्र श्रीलंकेचा संघ दुसऱ्या सामन्याप्रमाणेच भारतीय संघावर प्रभारी ठरला तर मात्र हे पारडं श्रीलंकेच्या बाजूने झुकण्यास वेळ लागणार नाही.  त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना 'करो या मरो' चा ठरणार आहे.

कधी होणार सामना :

शनिवारी 7 जानेवारी रोजी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या टी 20 मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगणार आहे. सायंकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून यापूर्वी अर्धातास अगोदर नाणेफेक पारपडले.

हे ही वाचा : IND VS SL : तिसऱ्या टी २० सामन्यात भारतीय संघ पडणार श्रीलंकेवर भारी? असा आहे सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवरील भारताचा रेकॉर्ड

कुठे पहाल सामना :

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर दाखवण्यात येणार आहे. यासोबतच हॉट्स स्टार च्या अँपवर देखील हा सामना प्रेक्षकांना लाईव्ह पहाता येणार आहे.

असा असेल भारतीय संघ :

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन (दुखापतग्रस्त), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार

असा असेल श्रीलंका संघ :

दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा

First published:
top videos

    Tags: Cricket, Hardik pandya, India Vs Sri lanka