बीग बॅश टी२० लीगमध्ये ब्रिस्बेन हीटने विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा २९ वर्षीय जोश ब्राउन हा विजयाचा शिल्पकार ठरला.
जोशने २३ चेंडूत ६२ धावांची वेगवान खेळी केली. यात ४ चौकार आणि ६ षटकार मारले. जोशने दुसऱ्या गड्यासाठी नाथन मॅक्सवानीसोबत ७३ धावांची भागिदारी केली. त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
जोश ब्राउनीने त्याच्या खेळातील कारकिर्दीची सुरुवात क्रिकेटने नव्हे तर फुटबॉलने केली होती. वयाच्या १३ व्या वर्षी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
२०१९ मध्ये त्याला ब्रिटनकडून संधी मिळाली. तेव्हा एका डावात २९० धावांची खेळी केली आणि पूर्ण हंगामात १ हजारहून अधिक धावा केल्या. तसंच ४३ विकेटही घेतल्या होत्या.
वयाच्या २२ व्या वर्षी ब्रिस्बेनमध्ये ग्रेड क्रिकेट खेळायला सुरुवात केलेल्या जोशने नॉर्थर्न सबअर्ब क्लबकडून पदार्पण केलं होतं.
२०२०-२१ चा हंगामात त्याने ५३ सामने खेळताना १६४३ धावा केल्या होत्या. यात ३ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश होता. तर २१ विकेट घेतल्या होत्या.
जोशचं क्रिकेट फक्त खेळण्यापूरतं नाही तर तो बॅटही तयार करतो. यासाठी त्याने खास प्रशिक्षणही घेतलं. स्वत:सह इतर खेळाडूंसाठीही बॅट बनवतो आणि बॅटही दुरुस्त करून देतो.
जोश म्हणतो की, 'मला क्रिकेट बॅट बनवायला आवडतं. दरवर्षी जवळपास १०० बॅट बनवतो आणि १ हजार पेक्षा जास्त बॅट दुरुस्त करतो.'