मुंबई, 11 जानेवारी : टीम इंडिया (Team India) सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. मंगळवारपासून दोन्ही टीमच्या तिसऱ्या टेस्टला (India vs South Africa) सुरूवात झाली आहे, पण ही टेस्ट सुरू होतानाच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ही टेस्ट मॅच संपल्यानंतर तीन वनडे मॅचची सीरिज होणार आहे. यासाठी वनडे टीम बुधवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे, पण त्याआधी ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar)याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेला जाणार नाही. केएल राहुल (KL Rahul) वनडे टीमचं नेतृत्व करणार आहे, कारण रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला नाही. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार वनडे टीममध्ये असलेले सगळे खेळाडू मुंबईमध्ये आहेत. 12 जानेवारीला ते दक्षिण आफ्रिकेमध्ये रवाना होणार आहेत. 22 वर्षांचा वॉशिंग्टन सुंदर मागच्या 10 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. त्याने अखेरचा सामना मार्च 2021 मध्ये खेळला होता. यानंतर त्याला दुखापत झाली, त्यामुळे तो टी-20 वर्ल्ड कपही (T20 World Cup 2021) से खेळू शकला नाही. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुंदरने चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्याला वनडे टीममध्ये स्थान मिळालं. बीसीसीआयने (BCCI) अजूनतरी सुंदरऐवजी दक्षिण आफ्रिकेला दुसरा खेळाडू पाठवण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही, पण बोर्डाच्या सूत्रांनी सांगितलं की, सुंदरची टेस्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली आहे, यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेत न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. टीममध्ये आर.अश्विन (R Ashwin) आणि युझवेंद्र चहल हे दोन स्पिनर आहेत. वनडे सीरिजच्या मॅच 19 जानेवारी, 21 आणि 23 जानेवारीला होणार आहेत. वनडे सीरिजसाठी भारतीय टीम केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत, ईशान किशन, आर अश्विन, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.