जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA T20 : विराटच नाही तर या सीनियर खेळाडूंनाही दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी आराम!

IND vs SA T20 : विराटच नाही तर या सीनियर खेळाडूंनाही दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी आराम!

IND vs SA T20 : विराटच नाही तर या सीनियर खेळाडूंनाही दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी आराम!

आयपीएल 2022 संपल्यानंतर (IPL 2022) भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) टी-20 सीरिज खेळणार आहे. आयपीएलच्या थकव्यामुळे या सीरिजसाठी बऱ्याच खेळाडूंना आराम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 मे : आयपीएल 2022 संपल्यानंतर (IPL 2022) भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) टी-20 सीरिज खेळणार आहे. आयपीएलच्या थकव्यामुळे या सीरिजसाठी बऱ्याच खेळाडूंना आराम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये विराट कोहलीचं (Virat Kohli) नाव आघाडीवर आहे. विराट सध्या खराब फॉर्ममध्ये आहे आणि लागोपाठ क्रिकेट खेळत आहे. फक्त विराटच नाही तर बाकीच्या सीनियर खेळाडूंनाही दक्षिण आफ्रिका सीरिजमधून आराम दिला जाऊ शकतो. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडिया जून-जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, त्यामुळे विराट कोहलीसारख्या खेळाडूला आराम गरजेचा आहे, त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी विश्रांती दिली जाईल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ‘विराट लागोपाठ क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तो नसेल याची शक्यता जास्त आहे. बऱ्याच काळापासून तो बायो-बबलमध्ये आहे. हा धोरणात्मक निर्णय असेल, विराटसह इतर खेळाडूंनाही टप्प्या टप्प्याने आराम दिला जाईल,’ असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली 5 टी-20 मॅचची सीरिज 9 ते 19 जूनपर्यंत होणार आहे. या मॅच दिल्ली, कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बँगलोरमध्ये होणार आहेत. यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड दौऱ्यातही टी-20 सीरिज आणि एक टेस्ट मॅच होईल. विराट कोहली सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2022 मध्ये तो तीनवेळा गोल्डन डकवर आऊट झाला. 12 सामन्यांमध्ये त्याने 19.63 च्या सरासरीने 216 रन केले. गेल्या काही काळापासून विराटला विश्रांतीचा सल्ला दिला जात आहे. नोव्हेंबर 2019 पासून विराटला एकही शतक करता आलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियाची निवड आयपीएलच्या अखेरीस होईल. रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) या सीनियर खेळाडूंनाही आरामाची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. विराटसोबत हे खेळाडूही सलग क्रिकेट खेळत असून बायो-बबलमध्ये आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज 5 मॅचची असल्यामुळे शेवटच्या 2 किंवा 3 मॅचमधून सीनियर खेळाडूंना विश्रांती द्यायचा विचार केला जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात