मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी रोहित टेन्शनमध्ये, विराटच मिळवून देणार विजय!

IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी रोहित टेन्शनमध्ये, विराटच मिळवून देणार विजय!

रोहित शर्माची (Rohit Sharma) भारताच्या वनडे टीमच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे.

रोहित शर्माची (Rohit Sharma) भारताच्या वनडे टीमच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे.

रोहित शर्माची (Rohit Sharma) भारताच्या वनडे टीमच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे.

मुंबई, 12 डिसेंबर : रोहित शर्माची (Rohit Sharma) भारताच्या वनडे टीमच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजपासून रोहित नवी सुरुवात करेल, पण दक्षिण आफ्रिकेत रोहितची कामगिरी निराशाजनक झाली आहे. दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) मात्र इकडे उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्यामुळे रोहितला जर कर्णधार म्हणून पहिल्या टी-20 सीरिजप्रमाणेच पहिली वनडे सीरिजही जिंकायची असेल, तर कोहलीला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. मागच्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये रोहित पहिल्यांदाच टीमचा पूर्णवेळ कर्णधार झाला, या सीरिजमध्ये टीम इंडियाचा विजय झाला होता.

रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेत 13 इनिंगमध्ये 20 च्या सरासरीने फक्त 256 रन केले आहेत, यात एक शतकाचा समावेश आहे. 115 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे, म्हणजेच 13 इनिंगमध्ये तो फक्त एकदाच 50 पेक्षा जास्त रन करू शकला आहे. त्याचा स्ट्राईक रेटही फक्त 68 चा आहे. रोहितची दक्षिण आफ्रिकेतली कामगिरी त्याच्या करियर आणि स्ट्राईक रेटपेक्षा खराब आहे.

कोहलीच्या 7 वेळा 50 पेक्षा जास्त रन

विराट कोहलीची दक्षिण आफ्रिकेतली कामगिरी धमाकेदार राहिली आहे. 15 इनिंगमध्ये त्याने 88 च्या सरासरीने 877 रन केले, यात 3 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे, म्हणजेच विराटने दक्षिण आफ्रिकेत 7 वेळा 50 पेक्षा जास्त रन केल्या. नाबाद 160 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. वनडे सीरिजसाठी अजून टीम इंडियाची निवड झालेली नाही, जर या सीरिजमध्ये विराटने 123 रन केल्या तर तो दक्षिण आफ्रिकेत 1 हजार रन करणारा तिसरा भारतीय बनेल.

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक रन करणारा भारतीय आहे. सचिनने 38 इनिंगमध्ये 38 च्या सरासरीने 1,453 रन केल्या, ज्यात 4 शतकं आणि 6 अर्धशतकं होती. सचिनशिवाय दुसऱ्या कोणत्याही भारतीयाला एक हजार रनचा टप्पा ओलांडता आला नाही. दक्षिण आफ्रिकेत सौरव गांगुली (Sourav Ganguly) सर्वाधिक शतक करणारा भारतीय आहे. गांगुलीच्या नावावर आफ्रिकेत 5 शतकं आणि 2 अर्धशतकं आहेत. भारताचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) इकडे 930 रन केले आहेत. या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडने या देशात 10 अर्धशतकं केली, त्याचा सर्वाधिक स्कोअर 84 रन आहे.

विराट कोहली दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक रन करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेत वनडेमध्ये भारताचे विजयाऐवजी पराभवच जास्त झाले आहेत. भारताने इकडे 53 मॅच खेळल्या, यातल्या 22 मध्ये भारताचा विजय आणि 27 मध्ये पराभव झाला. एक मॅच टाय झाली आणि 3 मॅचचा निकाल लागला नाही. 351 रन टीम इंडियाचा सर्वाधिक आणि 91 रन सर्वात कमी स्कोअर आहे.

First published:
top videos

    Tags: Rohit sharma, Virat kohli