Home /News /sport /

IND vs SA 4th T20 : 5 ओव्हरमध्ये 73 रन, कार्तिक-हार्दिकने आफ्रिकेला धुतलं!

IND vs SA 4th T20 : 5 ओव्हरमध्ये 73 रन, कार्तिक-हार्दिकने आफ्रिकेला धुतलं!

Photo-BCCI

Photo-BCCI

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 मध्ये (India vs South Africa 4th T20) 169/6 पर्यंत मजल मारता आली आहे.

    राजकोट, 17 जून : दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 मध्ये (India vs South Africa 4th T20)  169/6 पर्यंत मजल मारता आली आहे. दिनेश कार्तिकने 27 बॉलमध्ये 203.70 च्या स्ट्राईक रेटने 55 रन केले, यामध्ये 9 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याशिवाय हार्दिक पांड्याने 31 बॉलमध्ये 3 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 46 रनची खेळी केली. दिनेश कार्तिकचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यात कार्तिकने 42 रनची खेळी केली होती. तो टीम इंडियाचा पहिलाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताची सुरूवात खराब झाली. ऋतुराज गायकवाड 5 तर श्रेयस अय्यर 4 रनवर आऊट झाला. पॉवर प्ले संपल्यानंतर इशान किशनही 27 रनवर माघारी परतला. या सीरिजमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करणाऱ्या कर्णधार ऋषभ पंतला या सामन्यातही मोठी खेळी करता आली नाही. केशव महाराजने 17 रनवर पंतला आऊट केलं. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या. याशिवाय मार्को जेनसन, ड्वेन प्रिटोरियस, एनरिच नॉर्किया आणि केशव महाराज यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. 5 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने पिछाडीवर आहे, त्यामुळे सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी टीमला हा सामना जिंकणं गरजेचं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Hardik pandya, South africa, Team india

    पुढील बातम्या