Home /News /sport /

IND vs SA 3rd Test : भारताला लागोपाठ दोन धक्के, विराट-पुजारा ठरवणार मॅचचा निकाल!

IND vs SA 3rd Test : भारताला लागोपाठ दोन धक्के, विराट-पुजारा ठरवणार मॅचचा निकाल!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली तिसरी टेस्ट (India vs South Africa 3rd Test) रोमांचक अवस्थेमध्ये पोहचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 57/2 एवढा झाला आहे. विराट कोहली (Virat Kohli) 14 रनवर तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 9 रनवर खेळत आहेत.

पुढे वाचा ...
    केपटाऊन, 12 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली तिसरी टेस्ट (India vs South Africa 3rd Test) रोमांचक अवस्थेमध्ये पोहचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 57/2 एवढा झाला आहे. विराट कोहली (Virat Kohli) 14 रनवर तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 9 रनवर खेळत आहेत. भारताकडे आता 70 रनची आघाडी आहे. दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या तासामध्ये भारताने दोन्ही ओपनर गमावले. केएल राहुल 10 रनवर तर मयंक अग्रवाल 7 रनवर आऊट झाले. मार्को जेनसन आणि कागिसो रबाडा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा 210 रनवर ऑल आऊट केला, ज्यामुळे टीम इंडियाला 13 रनची आघाडी मिळाली. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) धमाकेदार कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेऊन दिली नाही. दिवसाच्या दुसऱ्याच बॉलला बुमराहने एडन मार्करमला बोल्ड केलं. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 42 रन देऊन 5 विकेट घेतल्या. तर उमेश यादव आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. शार्दुल ठाकूरला 1 विकेट घेण्यात यश आलं. केपटाऊनमध्ये सुरू असलेली या टेस्टच्या पहिल्या दोन्ही दिवशी 11-11 विकेट गेल्या, त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही रोमांचक होण्याची शक्यता आहे. विराट आणि पुजारा तिसऱ्या दिवशी भारताला सावध सुरूवात करून द्यायचा प्रयत्न करतील, तर दक्षिण आफ्रिकेचे बॉलर्स सुरुवातीलाच धक्के देण्यासाठी आग्रही असतील. रहाणे आणि ऋषभ पंतचा फॉर्म टीमसाठी चिंतेचा विषय आहे, त्यामुळे आफ्रिकेला तिसऱ्या दिवशी सुरुवातीलाच विकेट मिळाली तर भारतासाठी अडचणी वाढू शकतात. सेंच्युरियनमधल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला, यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने कमबॅक केलं, यानंतर सीरिज आता 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता केपटाऊनची टेस्ट निर्णायक ठरणार आहे. भारताला अजूनपर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही, त्यामुळे केपटाऊन टेस्ट जिंकून इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Pujara, South africa, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या