मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA 3rd T20 : टीम इंडियाला सीरिज वाचवण्याची अखेरची संधी, आफ्रिकेने पुन्हा टॉस जिंकला

IND vs SA 3rd T20 : टीम इंडियाला सीरिज वाचवण्याची अखेरची संधी, आफ्रिकेने पुन्हा टॉस जिंकला

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमधल्या (India vs South Africa 3rd T20) पहिल्या दोन्ही मॅच गमावल्यानंतर आता टीम इंडियाला तिसरा सामना करो या मरो चा आहे.

विशाखापट्टणम, 14 जून : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमधल्या (India vs South Africa 3rd T20) पहिल्या दोन्ही मॅच गमावल्यानंतर आता टीम इंडियाला तिसरा सामना करो या मरो चा आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने (Temba Bavuma) पुन्हा एकदा टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. लागोपाठ तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत याच्यावर टॉस गमावण्याची नामुष्की ओढावली आहे. आश्चर्यकारकरित्या भारताने या सामन्यात टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही, तर दक्षिण आफ्रिकाही तीच टीम घेऊन मैदानात उतरत आहे.

दिल्लीत झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पहिले बॅटिंग करत 210 पेक्षा जास्तचा स्कोअर केला, पण बॉलरना हे आव्हान रोखण्यात अपयश आलं. तर दुसऱ्या सामन्यात टीमचे बॅट्समन अपयशी ठरले. पहिले बॅटिंग करत टीम इंडियाला 150 रनचा टप्पाही गाठता आला नाही.

Live Score पाहण्यासाठी क्लिक करा

भारताची टीम

ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान

दक्षिण आफ्रिकेची टीम

टेम्बा बऊमा, रिझा हेन्ड्रिक्स, ड्वेन प्रिटोरियस, रस्सी व्हॅन डर डुसेन, हेनरिच क्लासीन, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, तबरेझ शम्सी, एनरिच नॉर्किया

First published:

Tags: South africa, Team india