मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : 4,4,4,4,4... एका फोरने हुकलं रेकॉर्ड, ऋतुराजने झळकावलं खणखणीत अर्धशतक!

IND vs SA : 4,4,4,4,4... एका फोरने हुकलं रेकॉर्ड, ऋतुराजने झळकावलं खणखणीत अर्धशतक!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने (India vs South Africa 3rd T20) 20 ओव्हरमध्ये 179/5 पर्यंत मजल मारली आहे. इशान किशन (Ishan Kishan) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) या दोन ओपनरनी आक्रमक सुरूवात करून दिल्यानंतरही भारताला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं.

पुढे वाचा ...

विशाखापट्टणम, 14 जून : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने (India vs South Africa 3rd T20) 20 ओव्हरमध्ये 179/5 पर्यंत मजल मारली आहे. इशान किशन (Ishan Kishan) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) या दोन ओपनरनी आक्रमक सुरूवात करून दिल्यानंतरही भारताला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं. ऋतुराज आणि इशान यांच्यात 10 ओव्हरमध्ये 97 रनची पार्टनरशीप झाली, त्यामुळे भारत 200 रनचा टप्पा गाठेल असं वाटत होतं, पण यानंतर टीमची बॅटिंग गडगडली.

ऋतुराज गायकवाडने 35 बॉलमध्ये 57 रन तर इशान किशनने 35 बॉलमध्ये 54 रनची खेळी केली. ऋतुराज गायकवाडने एनरिक नॉर्कियाच्या एका ओव्हरमध्ये लागोपाठ 5 फोर मारल्या पण सहावी फोर मारण्यात त्याला अपयश आलं. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा ऋतुराजचं पहिलंच अर्धशतक आहे, तसंच हा त्याचा सर्वाधिक स्कोअरही आहे.

25 वर्षांच्या ऋतुराजने इनिंगच्या पाचव्या ओव्हरमध्ये एनरिक नॉर्कियाला लागोपाठ 5 फोर ठोकल्या. ऋतुराजने या मॅचआधी सर्व प्रकारच्या टी-20 क्रिकेटमध्ये 79 सामन्यांमध्ये 34 च्या सरासरीने 2,466 रन केले होते, त्यामुळे त्याचे टी-20 क्रिकेटमध्ये 2,500 रनही पूर्ण झाले.

पहिल्या दोन्ही मॅच गमावल्यानंतर भारताला सीरिज वाचवण्यासाठी या तिन्ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, याशिवाय रबाडा, तबरेझ शम्सी आणि केशव महाराज यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

First published:

Tags: South africa, Team india