मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : सेंच्युरियनमध्ये धक्का, जोहान्सबर्ग टेस्टआधी द्रविडची टीम इंडियाला तंबी!

IND vs SA : सेंच्युरियनमध्ये धक्का, जोहान्सबर्ग टेस्टआधी द्रविडची टीम इंडियाला तंबी!

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या दुसऱ्या टेस्टला (India vs South Africa) सोमवार 3 जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) टीम इंडियाला तंबी दिली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 2 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या दुसऱ्या टेस्टला (India vs South Africa) सोमवार 3 जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये सुरूवात होणार आहे. सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 113 रननी विजय झाला होता, ज्यामुळे भारताने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली होती. पहिली टेस्ट जिंकली असली तरी भारताला मोठा धक्का बसला होता. स्लो ओव्हर रेटमुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC) एक पॉईंट गमवावा लागला. याआधी ऑगस्ट 2021 मध्येही नॉटिंघम टेस्टमध्ये भारताने 2 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉईंट्स गमावले होते. स्लो ओव्हर रेटमुळे कमी झालेले हे पॉईंट्स टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अडचणीचे ठरू शकतात.

पॉईंट्स गमावण्याच्या या मुद्द्यावरून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) टीम इंडियाला तंबी दिली आहे. भारताला वेळेमध्ये निर्धारित ओव्हर टाकणं गरजेचं असल्याचं द्रविड म्हणाला आहे. आयसीसी स्पष्टपणे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे, एक कोच म्हणून हे त्रासदायक आहे, पण आम्हाला वेळेत ओव्हर टाकण्यासाठी बॉलरना प्रेरित करावं लागणार आहे, अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली.

स्लो ओव्हर रेटच्या मुद्द्यावरून द्रविडने आयसीसीलाही विनंती केली आहे. 'आयसीसीच्या नियमांबाबत काहीही आक्षेप नाही, पण अधिकाऱ्यांनीही पॉईंट्स कापताना परिस्थिती समजून घेतली पाहिजे. काहीवेळा सूट दिली जाऊ शकते. याआधी आयसीसीने खेळाडूंची मॅच फी कापण्याचा निर्णय घेतला पण तरीही काही फरक पडला नाही,' असं द्रविड म्हणाला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन टेस्टमध्ये 8 ओव्हर कमी टाकल्यामुळे इंग्लंडला 8 पॉईंट्स गमवावे लागले. याआधीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही ऑस्ट्रेलियाला स्लो ओव्हर रेटमुळे पॉईंट्स कापल्याने फायनलमध्ये प्रवेश मिळाला नव्हता.

'आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी पॉईंट्स कापण्याचा निर्णय घेतला, याबाबत मला काहीच आक्षेप नाही, पण परिस्थितीनुसार सूट मिळायला पाहिजे. मागच्या वेळी आमच्या काही खेळाडूंना दुखापत झाली होती. आम्हाला सूट देण्यात आली, पण प्रत्येकवेळी असं होत नाही. तुम्ही किती मिनीटं गमावता, हे सांगणं कठीण आहे. बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापत झाली तेव्हा फिजियो मैदानात आला आणि त्याने प्रथमोपचार केले. यानंतर बुमराहला मैदानाबाहेर न्यावं लागलं. तसंच बॉल बदलण्याच्या मुद्द्यावरूनही काही वेळ फुकट गेला,' असं वक्तव्य द्रविडने केलं.

भारतीय टीम परदेशामध्ये चार फास्ट बॉलर घेऊन खेळते, त्यामुळे निर्धारित वेळात ओव्हर पूर्ण करणं कठीण जातं. घरच्या मैदानात मात्र स्पिनर्सची भूमिका महत्त्वाची होते, ज्यामुळे ओव्हरही लवकर पूर्ण होतात.

First published:

Tags: Rahul dravid, South africa, Team india, WTC ranking