कटक, 12 जून : पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभव झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa 2nd T20) पाच टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. यानंतर आता रविवारी भारतीय टीम सीरिजमध्ये बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरेल. कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजता मॅचला सुरूवात होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्याशिवाय खेळत असल्यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये अनुभवाची कमी आहे, याचाच प्रत्यय पहिल्या सामन्यातही आला. पहिल्या सामन्यात भारतीय बॅटिंगला मोठा स्कोअर करण्यात यश आलं असलं तरी भारताचे बॉलर्स मात्र अपयशी ठरले. भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांनी जास्त रन दिल्या, त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात पंत उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना संधी देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांनी आयपीएल 2022 मध्ये धमाकेदार कामगिरी केली, या कामगिरीच्या जोरावरच त्यांची टीम इंडियामध्ये निवड झाली, पण पहिल्या सामन्यात दोघांनाही पदार्पणाची संधी मिळाली नाही. उमरान मलिक 150 किमी प्रती तासाच्या वेगाने सातत्याने बॉलिंग करतो, तर डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग त्याच्या यॉर्कर टाकण्याच्या क्षमतेमुळे ओळखला जातो. मागच्या सामन्यात भारतीय बॉलर्सनी दिलेल्या रन बघता ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) या दोघांचा नक्कीच विचार करतील. भारतीय टीम ऋषभ पंत (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक दक्षिण आफ्रिकेची टीम टेम्बा बऊमा, क्विंटन डिकॉक, रिजा हेन्ड्रिक्स, हेनरिच क्लासिन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी व्हॅन डर डुसेन, मार्को जेनसन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.