कटक, 12 जून : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात (India vs South Africa 2nd T20) भारताची बॅटिंग गडगडली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमा याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताला 20 ओव्हरमध्ये 148/6 पर्यंत मजल मारता आली. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 30 रन केल्यामुळे भारताला या स्कोअरपर्यंत पोहोचता आलं. दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) 21 बॉलमध्ये नाबाद 30 रन केले तर हर्षल पटेल 9 बॉलमध्ये 12 रनवर नाबाद राहिला.
Live Score पाहण्यासाठी क्लिक करा
भारताकडून श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वाधिक 40 रन केले तर इशान किशन 34 रन करून आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिच नॉर्कियाने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. याशिवाय रबाडा, पारनेल, प्रिटोरियस आणि केशव महाराज यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
याआधी दिल्लीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव केला होता. डेव्हिड मिलर आणि रस्सी व्हॅन डर डुसेन यांच्या वादळी खेळींमुळे दक्षिण आफ्रिकेने 212 रनचं आव्हान पार केलं होतं. टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेला एवढ्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करता आला होता. 5 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये बरोबरी करण्यासाठी टीम इंडियाला दुसरी टी-20 जिंकणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa, T20 cricket, Team india