पार्ल, 21 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातली दुसरी वनडे पार्लच्या बोलांड पार्कमध्ये सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताने 50 ओव्हरमध्ये 287/6 पर्यंत मजल मारली. केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांची अर्धशतकं आणि शार्दुल ठाकूर-आर.अश्विन यांच्यात झालेल्या नाबाद 48 रनच्या पार्टनरशीपमुळे भारताला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. ठाकूरने 38 बॉलमध्ये नाबाद 40 तर अश्विनने 24 बॉलमध्ये 25 रनची नाबाद खेळी केली.
ऋषभ पंतने या सामन्यात 85 रनची आक्रमक खेळी केली. हा पंतचा वनडे करियरमधला सर्वाधिक स्कोअर आहे. याचसोबत पंत विकेट कीपर म्हणून दक्षिण आफ्रिकेत टेस्ट आणि वनडेमध्ये सर्वाधिक स्कोअर करणारा भारतीय खेळाडू बनला आहे.
ऋषभ पंतने त्याच्या इनिंगदरम्यान राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांचा विक्रम मोडला. द्रविडने कीपर असताना 2001 साली डरबनमध्ये 77 रनची खेळी केली होती. एमएस धोनीने 2013 साली जोहान्सबर्गमध्ये 65 रन केले होते. पंतने त्याच्या 71 बॉलच्या खेळीमध्ये 10 फोर आणि 2 सिक्स मारल्या. शतकाकडे वाटचाल करत असताना तबरेझ शम्सीच्या बॉलिंगवर पंतने एडन मार्करमला कॅच दिला.
ऋषभ पंतने ऑक्टोबर 2018 साली वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानात वनडेमध्ये पदार्पण केलं होतं. 20 वनडेमध्ये त्याने 35 च्या सरासरीने 630 रन केले. पंतच्या नावावर 4 अर्धशतकं आहेत, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 113 चा आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पंतने आतापर्यंत 4 शतकं केली आहेत.
टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर शिखर धवन आणि केएल राहुलच्या जोडीने भारताला चांगली सुरूवात करून दिली, पण 12 व्या ओव्हरला शिखर धवन 29 रनवर आऊट झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला विराट कोहली लगेच शून्य रनवर माघारी परतला. लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर राहुलने ऋषभ पंतच्या मदतीने भारताचा डाव सावरला. राहुल आणि पंत यांच्यामध्ये 115 रनची पार्टनरशीप झाली. राहुलने 79 बॉलमध्ये 4 फोरच्या मदतीने 55 रन केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rishabh pant, South africa, Team india