मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA 1st Test : एकाच दिवशी पडल्या 18 विकेट, सेंच्युरियन टेस्ट रोमांचक अवस्थेत

IND vs SA 1st Test : एकाच दिवशी पडल्या 18 विकेट, सेंच्युरियन टेस्ट रोमांचक अवस्थेत

 भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 1st Test) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी तब्बल 18 विकेट गेल्या आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 16/1 एवढा झाला आहे.

सेंच्युरियन, 28 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 1st Test) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी तब्बल 18 विकेट गेल्या आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 16/1 एवढा झाला आहे. भारताची आघाडी आता 146 रनची झाली आहे. दिवसाअखेरीस केएल राहुल 4 रनवर तर नाईट वॉचमन म्हणून बॅटिंगला आलेला शार्दुल ठाकूर 4 रनवर खेळत आहे. मयंक अग्रवाल 4 रनवर आऊट झाला, त्याला मार्को जेनसनने माघारी पाठवलं. त्याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेचा 197 रनवरच ऑल आऊट केला, त्यामुळे टीम इंडियाला 130 रनची मोठी आघाडी मिळाली.

भारताकडून मोहम्मद शमीने (Mohammad Shami) सर्वाधिक 5 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराजला एक विकेट घेण्यात यश आलं. दक्षिण आफ्रिकेकडून टेम्बा बऊमाने सर्वाधिक 52 रन केल्या, तर क्विंटन डिकॉक 34 रन करून आऊट झाला.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारताने 272/3 अशी केली होती, पण 278 रनवर भारताला केएल राहुलच्या रुपात चौथा धक्का लागला, यानंतर भारताची बॅटिंग गडगडली. 49 रनमध्येच भारताने शेवटच्या 7 विकेट गमावल्या. केएल राहुलने (KL Rahul) सर्वाधिक 127 रनची खेळी केली. याशिवाय मयंक अग्रवालने 60 आणि अजिंक्य रहाणेने 48 रन केले. फास्ट बॉलर लुंगी एनगिडीने 71 रन देऊन 6 विकेट मिळवल्या. याशिवाय कागिसो रबाडाला 3 विकेट मिळाल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही.

First published:
top videos

    Tags: South africa, Team india