• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 WC: टीम इंडियाच्या पराभवाला MS Dhoni जबाबदार, पाकिस्तानच्या TV शो चा निष्कर्ष

T20 WC: टीम इंडियाच्या पराभवाला MS Dhoni जबाबदार, पाकिस्तानच्या TV शो चा निष्कर्ष

MS Dhoni

MS Dhoni

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्तानकडून टीम इंडियाला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला. या दारुण झालेल्या पराभवाला पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक (Inzamam Ul Haq) यांनी टीम इंडियाच्या मेटॉर भूमिकेत असणाऱ्या महेंद्र सिंह धोनीला (MS Dhoni)जबाबदार धरले आहे.

 • Share this:
  दुबई, 25 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्तानकडून टीम इंडियाला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला. या दारुण झालेल्या पराभवाला पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक (Inzamam Ul Haq) यांनी टीम इंडियाच्या मेटॉर भूमिकेत असणाऱ्या महेंद्र सिंह धोनीला (MS Dhoni)जबाबदार धरले आहे. इंझमाम उल हक हे पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जातात. त्यांनी, काल झालेल्या टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यावर भाष्य केले. अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीलाच खराब सुरुवात आणि सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघ (Team India)पराभूत झाला. आधी खराब फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्या. ज्यानंतर पाकिस्तान संघाने अप्रतिम अशी फलंदाजी करत सामना 10 विकेट्सने खिशात घातला. भारताच्या दारुण झालेल्या पराभवावर इंझमाम उल हक यांनी आपले मत मांडत मेटॉर भूमिकेत असणाऱ्या महेंद्र सिंह धोनीला जबाबदार धरले. ते म्हणाले, बीसीसीआयचा धोनीला मेटॉर बनवण्याचा निर्णय चुकीचा आहे. खरंतर याची गरजच नव्हती. कारण इंडियाकडे मुख्य कोच रवी शास्त्री आणि विराट कोहलीसारखे मोठे खेळाडू आहेत. त्यामुळे टिम इंडियाकडे अजूनही काही गोष्टी कमी आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमामच्या मते, काही काळापूर्वी धोनी आणि विराटमध्ये वाद झाला होता. त्यामुळे या सर्व गोष्टी आमच्या बाजूने गेल्या असल्याचे इंझमाम यांनी म्हटले आहे. तसेच, इंझमाम यांच्या या वक्तव्याला मुश्ताक अहमद यांना पाठिंबा दर्शवला आहे. धोनीने विराट कोहलीचा मूड बदलण्याचा जो विचार केला होता, तोच उलटा पडला. मुश्ताकच्या मते, विराटची ताकद त्याची आक्रमकता आहे. पण, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जगाला बदललेला विराट पाहायला मिळाला. तो अगदी शांत राहण्याचा प्रयत्न करत होता, जणू काही तो नव्हता. एक मार्गदर्शक म्हणून धोनीने त्याला शांत राहण्यास सांगितले असावे. असे मत मुश्ताक यांनी व्यक्त केले.
  Published by:Dhanshri Otari
  First published: