कानपूर, 26 नोव्हेंबर: टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरुवात झाली आहे. टॉम लॅथन आणि विल यंग मैदानात उतरले आहेत. दरम्यान दुसऱ्या षटकादरम्यान एक अनपेक्षित किस्सा घडला. भारतीय बेस्ट अंपायरकडून चुक झाली असल्याचे निर्दशनास आले.
टीम इंडिायाकडून इंशात बॉलिंग करत होता. तेव्हा इशांतचा चेंडू लॅथमच्या पॅडला लागला. मैदानातील पंच नितीन मेनन यांनी त्याला पायचित दिले. मात्र, चेंडूने आधी बॅटची कड घेतली होती. ही गोष्टी लॅथमला माहिती होती. क्षणाचाही विलंब न घेता लॅथमने रिव्ह्यू घेतला आणि त्याने स्वत:ची विकेट वाचवली. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर लॅथमने यशस्वी रिव्ह्यू घेतला. पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. न्यूझीलंडच्या यशस्वी रिव्ह्यूमुळे इशांतच्या विकेटचा शोध कायम राहिला.
पण क्रिकेट जगतात बेस्ट अंपायर मानले जाणारे नितीन मेनन यांच्याकडून झालेली ही छोटीशी चूक किवींच्या संघासाठी मोठी चूक ठरली असती.
पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर संपला आहे. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल, रविंद्र जाडेचा यांनी पहिल्या डावात केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर हे शक्य झालं आहे. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर 105, शुभमन गिल 52, रवींद्र जाडेजा 50 आणि आर आश्विननं 38 धावा केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Test series