INDvsNZ : 'सिनिअर-ज्युनिअर मुद्दाच नाही, पंतने स्वीकारावं की...',अजिंक्य रहाणेनं दिला सल्ला

INDvsNZ : 'सिनिअर-ज्युनिअर मुद्दाच नाही, पंतने स्वीकारावं की...',अजिंक्य रहाणेनं दिला सल्ला

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेत ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. दरम्यान पहिल्या कसोटीआधी अजिंक्य रहाणेनं पंतबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

  • Share this:

वेलिंग्टन, 20 फेब्रुवारी : शुक्रवारपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. टी20 मध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करावा लागला. या दौऱ्यात भारताच्या ऋषभ पंतला आतापर्यंत एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. आता कसोटी सामन्याआधी त्याची चर्चा होत आहे. भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं पंतबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रहाणे म्हणाला की, पंतला आता स्वीकारायला हवं की सध्या त्याच्यासाठी खडतर काळ आहे. चांगला क्रिकेटपटू होण्याकडे लक्ष केंद्रीत करून त्याने वाटचाल केली पाहिजे असा सल्लाही रहाणेनं दिला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यात पंतला दुखापत झाली होती. त्यानंतर पंत न्यूझीलंड दौऱ्यात आतापर्यंत संघात खेळू शकला नाही. त्याच्या जागी यष्टीरक्षणाची जबाबदारी अजिंक्य रहाणेने पार पाडली. फक्त यष्टीरक्षणच नाही तर फलंदाजीतही रहाणेनं जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला की, पंतने आता हे स्वीकारलं पाहिजे की आपण कुठं उभा आहे. इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता सकारात्मक राहून जास्त शिकण्याची आवश्यकता आहे.

अजिंक्य रहाणे म्हणाला की, तुम्ही सिनिअर आहात की ज्युनिअर हा मुद्दा नाही. कोणालाही संघातून बाहेर राहणं चांगलं नाही वाटतं. पण संघाला काय हवं आहे हे बघायला हवं. प्रत्येक खेळाडूसाठी हे महत्वाचं आहे.

हार्दिक पांड्या फिट झाला नाही तर, मुंबई इंडियन्सकडे असणार ‘हे’ 5 पर्याय

वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडचे पारडे जड असेल असंही अजिंक्य रहाणे म्हणाला. गोलंदाजांना माहिती आहे की अचूक मारा कसा करायचा. तसंच त्यांचे फलंदाजही इथली परिस्थिती जाणून आहेत. आम्हाला इथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागेल. न्यूझीलंडमध्ये मैदानांचा आकार वेगवेगळा आहे. प्रथम फलंदाजी करताना संघासाठी सकारात्मक वातावरण असतं. पण भारताबाहेर पहिल्या डावात 320 ते 330 धावा चांगल्या असतील असंही अजिंक्य रहाणे म्हणाला.

‘Mother from another Brother...’, 'पाकिस्तानी खेळाडूच्या ट्वीटमुळे MEMES चा पाऊस

First published: February 20, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या