Home /News /sport /

धुलाई शिवम दुबेची पण ट्रोल झाला दुसराच गोलंदाज, ICC च्या प्रश्नावर उत्तर देऊन फसला

धुलाई शिवम दुबेची पण ट्रोल झाला दुसराच गोलंदाज, ICC च्या प्रश्नावर उत्तर देऊन फसला

भारताच्या शिवम दुबेने एका षटकात 34 धावा दिल्यानंतर आयसीसीने एक प्रश्न विचारला होता. त्यावर रिप्लाय देणं इंग्लंडच्या गोलंदाजाला महागात पडलं आहे.

  मुंबई, 03 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा टी20 सामना भारताने 7 धावांनी जिंकून मालिकेत 5-0 ने जिंकली. या सामन्यात भारताच्या शिवम दुबेने एका षटकात 34 धावा दिल्या. टी20 मध्ये त्याचं हे सर्वात महागडं दुसरं षटक ठरलं. आयसीसीने शिवम दुबेने केलेल्या धावांच्या खैरातीवरून एक प्रश्न चाहत्यांना विचारला होता. त्यावर इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेली कमेंट सध्या चर्चेत आली आहे. भारताने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था एकवेळ 3 बाद 17 अशी झाली होती. त्यानंतर रॉस टेलर आणि टिम सेफर्टने सावध खेळ करत डाव सावरला. 9 षटकांत न्यूझीलंडच्या 64 धावा झाल्या होत्या. त्यानतंर दहाव्या षटकात सेफर्ट आणि टेलरने शिवम दुबेच्या एका षटकात तब्बल 34 धावा वसूल केल्या. शिवम दुबेच्या या एका षटकात सेफर्टने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार मारले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. चौथ्या चेंडूवर एक धाव काढल्यानंतर रॉस टेलरने पाचव्या चेंडूवर चौकार मारला. मात्र, तो नोबॉल असल्याने फ्रि हिट मिळाला. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर रॉस टेलरने षटकार लगावले. अशा एकूण 34 धावा कुटल्या. त्यानंतर बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी यांनी सामना पुन्हा भारताच्या बाजूने वळवला.
  टी20 मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत शिवम दुबे पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या आधी स्टुअर्ट बिन्नीने विंडीजविरुद्ध एका षटकात 32 धावा दिल्या होत्या. तर सुरेश रैनाने 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका षटकात 26 धावा दिल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र टी20 मध्ये शिवम दुबे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये स्टुअर्ट ब्रॉड आजही पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या एका षटकात युवराज सिंगने सहा षटकार ठोकून 36 धावा वसूल केल्या होत्या. आयसीसीने याच मुद्यावर प्रश्न विचारला होता. शिवम दुबेने एका षटकात 34 धावा दिल्या. तो दुसरा सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. तर सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज माहिती आहे का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना विचारला होता. त्यावर स्टुअर्ट ब्रॉडने चक्क नाही असं उत्तर दिलं आहे. त्यामुळे युवराजने मारलेले 6 षटकार स्टुअर्ट विसरला काय असे प्रश्नही अनेकांनी विचारले आहेत. तसंच युवराजने मारलेल्या षटकारांची आठवणही करून दिली. फलंदाज, यष्टीरक्षक, कर्णधार! भारताच्या संकटमोचकानं 14 दिवस घेतलं होतं कोंडून हा तर षटकारच होता पण सुपरमॅन संजू सॅमसनने केली कमाल, VIDEO एकदा बघाच
  Published by:Suraj Yadav
  First published:

  Tags: Cricket

  पुढील बातम्या