जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / 2021 मध्ये कसोटी सामन्यात चालली रविचंद्रन अश्विनची जादू, शेन वॉर्न-इम्रान खान यांनाही टाकलं मागे

2021 मध्ये कसोटी सामन्यात चालली रविचंद्रन अश्विनची जादू, शेन वॉर्न-इम्रान खान यांनाही टाकलं मागे

R Ashwin Test Records: रविचंद्रन अश्विन सध्याच्या काळात भारतीय संघातील सर्वात बेस्ट टेस्ट मॅच विनर आहे. भारताच्या या ऑफस्पिनर गोलंदाजाने 2021 मध्ये कसोटी सामन्यात 50 हून अधिक विकेट्स घेतल्या आहे, यावर्षी त्याच्या एकट्याच्याच नावावर हा विक्रम आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये अश्विनने 14 विकेट्स पटकावल्या आणि या जबरदस्त कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द सिरीज देऊन गौरवण्यात आले आहे. या कामगिरीनंतर त्याने दिग्गज स्पिनर शेन वॉर्न आणि इम्रान खान यांना मागे टाकले आहे.

01
News18 Lokmat

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (R Ashwin Latest Records) सध्या कसोटी क्रिकेटमध्ये जोरदार फॉर्ममध्ये खेळत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले की तो बेस्ट टेस्ट मॅच विनर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अश्विनला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याला 9व्यांदा हा सन्मान मिळाला आहे. (फोटो-एएफपी)

जाहिरात
02
News18 Lokmat

यानंतर अश्विनने सर्वाधिक 'मॅन ऑफ द सिरीज'च्या बाबतीत जॅक कॅलिसची बरोबरी केली आहे. तर सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज मिळवण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या (11) नावावर आहे. अश्विनने शेन वॉर्न, रिचर्ड हेडली आणि इम्रान खान यांना मागे टाकले असून या तिन्ही खेळाडूंनी आठ वेळा हे स्थान गाठले आहे. (एएफपी)

जाहिरात
03
News18 Lokmat

मुथय्या मुरलीधरनने 133 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 61 मालिका खेळून 11 वेळा हा मान मिळवला आहे. पण भारताचा अश्विन केवळ 81 सामन्यांत 33 मालिका खेळून 9 वेळा मालिकावीर ठरला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने 61 कसोटी मालिकेत 9 वेळा हा मान मिळवला आहे. (इन्स्टाग्राम)

जाहिरात
04
News18 Lokmat

याशिवाय भारताच्या विजयानंतर रविचंद्रन अश्विनने मायदेशात 300 कसोटी बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या क्लबमध्ये प्रवेश केला. भारतासाठी अश्विनपूर्वी, हा पराक्रम फक्त अनिल कुंबळेने केला आहे, ज्याने आपल्या देशात 350 विकेट्स घेतल्या आहेत. कुंबळे आणि अश्विननंतर हरभजन सिंग (265) आणि कपिल देव (219) यांचा क्रमांक लागतो. (एएफपी)

जाहिरात
05
News18 Lokmat

रविचंद्रन अश्विन हा एका कॅलेंडर वर्षात कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी त्याने 2015, 2016 आणि 2017 मध्ये ही कामगिरी केली होती. भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळेने ही कामगिरी तीन वेळा केली आहे. कुंबळेने 1999, 2004 आणि 2006 मध्ये एका वर्षात 50 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेतले. (एएफपी)

जाहिरात
06
News18 Lokmat

अश्विनने आतापर्यंत 81 कसोटी सामन्यात 24.12 च्या सरासरीने 427 बळी घेतले आहेत. यादरम्यान अश्विनने 30 वेळा इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतल्या आहेत. अनिल कुंबळे (619 विकेट्स) आणि कपिल देव (434 विकेट्स) यांच्यानंतर अश्विन भारताचा कसोटीतील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. (आर अश्विन- इंस्टाग्राम)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    2021 मध्ये कसोटी सामन्यात चालली रविचंद्रन अश्विनची जादू, शेन वॉर्न-इम्रान खान यांनाही टाकलं मागे

    भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (R Ashwin Latest Records) सध्या कसोटी क्रिकेटमध्ये जोरदार फॉर्ममध्ये खेळत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले की तो बेस्ट टेस्ट मॅच विनर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अश्विनला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याला 9व्यांदा हा सन्मान मिळाला आहे. (फोटो-एएफपी)

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    2021 मध्ये कसोटी सामन्यात चालली रविचंद्रन अश्विनची जादू, शेन वॉर्न-इम्रान खान यांनाही टाकलं मागे

    यानंतर अश्विनने सर्वाधिक 'मॅन ऑफ द सिरीज'च्या बाबतीत जॅक कॅलिसची बरोबरी केली आहे. तर सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज मिळवण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या (11) नावावर आहे. अश्विनने शेन वॉर्न, रिचर्ड हेडली आणि इम्रान खान यांना मागे टाकले असून या तिन्ही खेळाडूंनी आठ वेळा हे स्थान गाठले आहे. (एएफपी)

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    2021 मध्ये कसोटी सामन्यात चालली रविचंद्रन अश्विनची जादू, शेन वॉर्न-इम्रान खान यांनाही टाकलं मागे

    मुथय्या मुरलीधरनने 133 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 61 मालिका खेळून 11 वेळा हा मान मिळवला आहे. पण भारताचा अश्विन केवळ 81 सामन्यांत 33 मालिका खेळून 9 वेळा मालिकावीर ठरला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने 61 कसोटी मालिकेत 9 वेळा हा मान मिळवला आहे. (इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    2021 मध्ये कसोटी सामन्यात चालली रविचंद्रन अश्विनची जादू, शेन वॉर्न-इम्रान खान यांनाही टाकलं मागे

    याशिवाय भारताच्या विजयानंतर रविचंद्रन अश्विनने मायदेशात 300 कसोटी बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या क्लबमध्ये प्रवेश केला. भारतासाठी अश्विनपूर्वी, हा पराक्रम फक्त अनिल कुंबळेने केला आहे, ज्याने आपल्या देशात 350 विकेट्स घेतल्या आहेत. कुंबळे आणि अश्विननंतर हरभजन सिंग (265) आणि कपिल देव (219) यांचा क्रमांक लागतो. (एएफपी)

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    2021 मध्ये कसोटी सामन्यात चालली रविचंद्रन अश्विनची जादू, शेन वॉर्न-इम्रान खान यांनाही टाकलं मागे

    रविचंद्रन अश्विन हा एका कॅलेंडर वर्षात कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी त्याने 2015, 2016 आणि 2017 मध्ये ही कामगिरी केली होती. भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळेने ही कामगिरी तीन वेळा केली आहे. कुंबळेने 1999, 2004 आणि 2006 मध्ये एका वर्षात 50 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेतले. (एएफपी)

    MORE
    GALLERIES

  • 06 06