रायपूर, 21 जानेवारी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रायपूरमध्ये दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडचा अर्धा संघ अवघ्या 15 धावात बाद झाला. आतापर्यंतच्या इतिहासात न्यूझीलंडवर अशी वेळ कधीच आली नव्हती. इतक्या कमी धावात न्यूझीलंडचे 5 फलंदाज बाद झाले नव्हते.
भारताविरुद्ध दुसऱ्या सामन्या न्यूझीलंडचे पहिले पाच फलंदाज फक्त 15 धावांवर तंबूत परतले. न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या स्वस्तात अर्धा संघ बाद झाला. इतकंच नाही तर भारतीय गोलंदाजांनीसुद्धा एवढी सरस कामगिरी पहिल्यांदा केली आहे.
हेही वाचा : Dan Christian Retirement: कोहलीचा लाडका मॅचविनर, RCB चा खेळाडूनं तडकाफडकी घेतला संन्यास
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 2 तर मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. न्यूझीलंडच्या संघाने 10.3 षटकात त्यांचे पाच गडी गमावले होते. पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोहम्मद शमीने न्यूझीलंडचा सलमावीर फिन एलनला शून्यावर बाद केलं.
न्यूझीलंडची याआधी 2001 मध्ये श्रीलंकेविरुद्ध बिकट अवस्था झाली होती. कोलंबोत झालेल्या एकदिवसीय सामन्यात त्यांचे 18 धावात 5 गडी बाद झाले होते. तर 2010 मध्ये बांगलादेशविरुद्ध 20 धावात 5 विकेट गेल्या होत्या. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ५ बाद २१ अशी अवस्था झाली होती.
भारतातही न्यूझीलंड हा सर्वात कमी धावात पाच गडी बाद होणारा संघ ठरला आहे. गेल्या वर्षी इंग्लंडने 26 धावात 5 गडी गमावले होते. तर 1997 मध्ये पाकिस्तानची अवस्था 5 बाद 29 अशी झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket