मुंबई : हातून निसटणारा विजय पुन्हा मिळवून आणणाऱ्या खेळाडूनं अचानक क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या तडकाफडकी निर्णयामुळे क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आलं आहे. RCB साठी हा खेळाडू अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याने RCB ला हातून गेलेली मॅच जिंकवून दिली होती. हा खेळाडू त्यामुळे अधिक चर्चेत आला होता.
जाहिरात
जगभरात टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणारा ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर खेळाडू डॅन ख्रिश्चनने क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला. टी-20 क्रिकेटमधील यशस्वी खेळाडूंच्या लिस्टमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. फक्त बॅटिंग किंवा बॉलिंग नाही दोन्हीमध्ये त्याची कामगिरी अव्वल आहे. तो सध्या बीबीएलमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.