नवदीप सैनीने शेअर केला फोटो, पॉर्न स्टारच्या नावाने टीम इंडिया ट्रोल

नवदीप सैनीने शेअर केला फोटो, पॉर्न स्टारच्या नावाने टीम इंडिया ट्रोल

न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्तालयात गेल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी काढलेला सेल्फी सध्या व्हायरल होत आहे.

  • Share this:

वेलिंग्टन, 19 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. 21 फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनमध्ये होणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू भारतीय उच्चायुक्तालयात गेले होते. तिथं भारताच्या खेळाडूंनी काही फोटोही काढले. यातला एक फोटो भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने शेअर केला आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ट्रोल झाला आहे.

सैनीने एक ग्रुप सेल्फी शेअर केला आहे. त्यात इशांत शर्मा, मोहम्मद शमी, पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह हे दिसत आहेत. खेळांडूंसोबत टीम इंडियाचे फिटनेस कोच निक वेब हेसुद्धा दिसत आहेत. त्यांनाच चाहत्यांनी जॉनी सिन्स असं समजलं आहे. जॉनी सिन्स एक पॉर्न स्टार असून ते संघासोबत आहेत का असं विचारत चाहत्यांनी ट्रोल केलं आहे.

निक वेब टीम इंडियाचे नवीन ट्रेनर आहेत. शंकर बासू यांच्यानंतर निक वेब भारतीय संघाच्या चमूत दाखल झाले आहेत. निक न्यूझीलंडचे आहेत. न्यूझीलंड्या महिला क्रिकेट संघाचे ते ट्रेनर होते. याशिवाय त्यांच्याकडे रग्बी टीमच्या ट्रेनरचाही अनुभव आहे.

विराट कोहलीने भारतीय उच्चायुक्तालयात गेल्यानंतर सर्वांच मन जिंकून घेतलं आहे. त्याने म्हटलं की, न्यूझीलंडच्या लोकांमुळे खुप प्रभावित झालो आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कोणाबरोबर विजेतेपद विभागून घ्यायचं झालं तर तो न्यूझीलंडचा संघ असेल. विराट म्हणाला की, न्यूझीलंडच्या पाहुणचार पाहून भारवालो आहे. एकदिवसीय मालिका गमावली असली तरी कसोटीसाठी तयार असल्याचं विराट म्हणाला.

वाचा : निवृत्तीनंतर बायकोच्या ‘ताला’वर नाचणार युवी, क्रिकेट सोडून करणार हे काम

First published: February 19, 2020, 9:57 PM IST

ताज्या बातम्या