मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रिकेट ते हॉकी, भारतासाठी न्यूझीलंड ठरतोय व्हिलन, चार महत्त्वाच्या स्पर्धात हरवलंय

क्रिकेट ते हॉकी, भारतासाठी न्यूझीलंड ठरतोय व्हिलन, चार महत्त्वाच्या स्पर्धात हरवलंय

हॉकी वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने भारताला हरवून विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर ढकललंय. याआधी गेल्या चार वर्षात चार महत्त्वाच्या स्पर्धात न्यूझीलंड भारतासाठी खलनायक ठरला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 23 जानेवारी : हॉकी वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंविरुद्ध भारताचा पराभव झाल्याने वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. या पराभवामुळे भारतीय संघाला क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवता आलं नाही. न्यूझीलंडच्या संघाने याआधीही भारतीय संघाचा वर्ल्ड कप विजयाचा मार्ग रोखला होता. क्रिकेट ते हॉकीच्या चार महत्त्वाच्या स्पर्धात न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत केलंय.

2023च्या हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारत ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानी होता. क्रॉस ओव्हरमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकून भारत क्वार्टर फायनलमध्ये पोहोचू शकला असता. पण न्यूझीलंडने भारताला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवलं. महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्याने भारताचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

टी20 वर्ल्डकपमध्ये पराभव

2021 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ न्यूझीलंड आणि पाकिस्तानसोबत ग्रुपमध्ये होता. पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध विजय आवश्यक होता. पण न्यूझीलंडने भारताला कमी धावसंख्येत रोखलं आणि भारताने दिलेलं आव्हान सहज पार करत विजय मिळवला. यामुळे भारताचं आव्हान सेमीफायनलमध्ये पोहोचण्याआधीच संपुष्टात आलं होतं.

हेही वाचा : 26 जानेवारीला ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्याचे आयोजन, एश्ले गार्डनर भडकली

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली फायनल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाली होती. भारतीय संघ फॉर्ममध्ये होता आणि पहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र न्यूझीलंडच्या रॉस टेलरने केलेल्या फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने विजेतेपद पटकावलं.

वनडे वर्ल्ड कप

2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. रोहित, विराट तुफान फॉर्ममध्ये होते. सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडची फलंदाजी झाल्यानतंर पाऊस पडला. यामुळे सामना दुसऱ्या दिवशी खेळवण्यात आला. मात्र न्यूझीलंडने भारताला हरवलं आणि टीम इंडियाचं वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

First published:

Tags: Cricket, Hockey, Hockey World Cup 2023, World cup 2019