नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत (IND vs NZ) भारतीय क्रिकेटपटू हनुमा विहारी (Hanuma Vihari)भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. तेव्हापासून विहारी चर्चेत आला आहे. अशातच त्याने एक ट्विट केले जे गोंधळात टाकत आहे. विहारीचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
27 वर्षीय विहारी हा देशांतर्गत क्रिकेटमधील एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि जेव्हाही त्याला भारतीय कसोटी संघात संधी मिळते तेव्हा त्याने चमकदार कामगिरी केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर विहारी भारतीय संघाचा भाग होता पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर, न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत (IND vs NZ) भारतीय क्रिकेटपटू हनुमा विहारी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.
अशातच, विहारीने एक ट्विट केले. त्याने या ट्विटमध्ये ना कोणता फोटो शेअर केला आहे. ना कोणत्या आशयाची पोस्ट. त्यामध्ये केवळ त्याने स्वल्पविराम दिला आहे. त्याच्या या ट्विटमुळे क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे. ब्रेक घेणार की नव्या करिअरची सुरुवात करणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
,
— Hanuma vihari (@Hanumavihari) November 18, 2021
या ट्विटपूर्वी त्याने नेटमध्ये सराव करत असलेला व्हिडिओ शेअर केला होता. निवडकर्त्यांनी प्रियांक पांचालच्या नेतृत्वाखालील भारत अ संघात हनुमा विहारीचा समावेश केला आहे, जो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ब्लूमफॉन्टेन येथील मँगॉन्ग ओव्हल येथे तीन सामने खेळणार आहे. भारताच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी विहारीने तयारी करावी अशी निवडकर्त्यांची इच्छा आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
हनुमा विहारीने 94 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 55 च्या सरासरीने 7261 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 21 शतके आणि 37 अर्धशतके आहेत. विहारीनेही त्रिशतक झळकावले आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये असताना हनुमाने 80 सामन्यांमध्ये 42.87 च्या सरासरीने 3001 धावा केल्या आहेत. त्याने चार शतके आणि 20 अर्धशतके केली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.