मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ किवींचा 'मुंबईकर' ठरला हीरो, कमालीची बॉलिंग करत मोडला 41 वर्षाचा जुना विक्रम

IND vs NZ किवींचा 'मुंबईकर' ठरला हीरो, कमालीची बॉलिंग करत मोडला 41 वर्षाचा जुना विक्रम

ajaz patel

ajaz patel

न्यूझीलंडचा स्पिनर एजाझ पटेलने(Ajaz Patel) टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs NZ 2nd Test Series ) इतिहास रचला आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 5 डिसेंबर: न्यूझीलंडचा स्पिनर एजाझ पटेलने(Ajaz Patel) टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs NZ 2nd Test Series ) इतिहास रचला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या कसोटी सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी केली. एजाझने पहिल्या डावात सर्व 10 विकेट घेतल्या, त्यानंतर दुसऱ्या डावातही 4 विकेट घेतल्या. अशाप्रकारे त्याने या सामन्यात 14 विकेट्स घेतल्या.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम एजाझ पटेलच्या नावावर आहे. मुंबईतील या सामन्यात त्याने 225 धावा देत 14 बळी टिपले. आणि 41 वर्षाचा जुना विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या इयान बॉथमच्या नावावर होता. बोथमने 1980 मध्ये भारताविरुद्ध 106 धावांत 13 विकेट घेतल्या होत्या, तर रविचंद्रन अश्विनने 2016 साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 12 विकेट घेतल्या होत्या.

भारताविरुद्धच्या कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रमही आता एजाझच्या नावे झाला आहे. इतकेच नव्हे तर एजाझ पटेल हा न्यूझीलंडकडून कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करणारा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी रिचर्ड हॅडलीच्या नावावर हा विक्रम आहे. ज्याने 1985 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 123 धावांत 15 बळी घेतले होते. त्याचबरोबर डॅनियल व्हिटोरीने दोन वेळा एका सामन्यात 12-12 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताविरुद्धची सर्वोत्तम गोलंदाजी

14/225 एजाज पटेल (NZ), मुंबई 2021

13/106 इयान बॉथम (ENG), मुंबई 1980

12/70, स्टीव्ह ओ'कीफे (AUS), पुणे 2017

12/94, फजल महमूद (PAK), लखनौ 1952

First published:

Tags: 2nd test series, Test series