मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ : व्हाईस कॅप्टन, कॅप्टन आणि आता कोच, द्रविड पुन्हा त्याच वादात सापडला!

IND vs NZ : व्हाईस कॅप्टन, कॅप्टन आणि आता कोच, द्रविड पुन्हा त्याच वादात सापडला!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट (India vs New Zealand 1st Test) मॅच रोमांचक स्थितीमध्ये ड्रॉ झाली. टीम इंडियाला न्यूझीलंडची शेवटची विकेट मिळाली नाही, त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. यानंतर टीम इंडियाने इनिंग घोषित करायला उशीर केला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट (India vs New Zealand 1st Test) मॅच रोमांचक स्थितीमध्ये ड्रॉ झाली. टीम इंडियाला न्यूझीलंडची शेवटची विकेट मिळाली नाही, त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. यानंतर टीम इंडियाने इनिंग घोषित करायला उशीर केला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट (India vs New Zealand 1st Test) मॅच रोमांचक स्थितीमध्ये ड्रॉ झाली. टीम इंडियाला न्यूझीलंडची शेवटची विकेट मिळाली नाही, त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. यानंतर टीम इंडियाने इनिंग घोषित करायला उशीर केला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 1 डिसेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट (India vs New Zealand 1st Test) मॅच रोमांचक स्थितीमध्ये ड्रॉ झाली. टीम इंडियाला न्यूझीलंडची शेवटची विकेट मिळाली नाही, त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. यानंतर टीम इंडियाने इनिंग घोषित करायला उशीर केला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या मुद्द्यावरून कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यालाही विचारण्यात आलं, तेव्हा त्याने इनिंग त्यावेळी घोषित करण्याचं समर्थन केलं. पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवशी अखेरच्या 4 ओव्हर शिल्लक असताना भारताने डाव घोषित केला आणि न्यूझीलंडला विजयासाठी 284 रनचं आव्हान दिलं.

राहुल द्रविड (Rahul Dravid) याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच मॅच होती. कायमच वादांपासून लांब राहिलेला राहुल द्रविड इनिंग घोषित करण्याबाबत मात्र तीन वेळा वादात सापडला आहे. यातला एक वाद तो उपकर्णधार असताना, दुसरा कर्णधार असताना आणि आता तिसरा वाद कोच असताना झाला आहे. यातल्या एकदाच भारताने टेस्ट मॅच जिंकली. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या आत्मचरित्रामध्ये राहुल द्रविडच्या इनिंग घोषित करण्याच्या निर्णयावर सविस्तर लिहिलं आहे.

कानपूर टेस्टमध्ये भारताने अखरेच्या दिवशी 98 ओव्हर बॉलिंग केली, यादरम्यान भारताने किवी टीमच्या 9 विकेट घेतल्या, पण अखेरची जोडी तोडण्यात त्यांना अपयश आलं. मॅचदरम्यान स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मण, इरफान पठाण आणि आकाश चोप्रा या तिघांनी भारताने इनिंग घोषित करण्यासाठी उशीर केल्याचं मान्य केलं. विराट कोहली कॅप्टन असता तर त्याने आधीच डाव घोषित केला असता, ज्यामुळे बॉलरना न्यूझीलंडचा ऑल आऊट करण्यासाठी वेळ मिळाला असता, असं मत इरफान पठाणने मांडलं.

सचिन 194 वर असताना इनिंग घोषित

भारतीय क्रिकेटमधला इनिंग घोषित करण्याचा सगळ्यात मोठा वाद 2004 साली झाला होता, तेव्हा राहुल द्रविड कॅप्टन होता. पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने डाव घोषित केला तेव्हा सचिन तेंडुलकर नाबाद 194 रनवर खेळत होता. द्विशतकाजवळ असताना इनिंग घोषित केल्यामुळे सचिनने तेव्हाही नाराजी व्यक्त केली होती. सचिनने त्याचं आत्मचरित्र प्लेयिंग इट माय वे मध्ये याबाबत लिहिलं आहे.

'टी ब्रेकवेळी ड्रेसिंग रूममध्ये मी इनिंग घोषित करण्याबाबत विचारलं तेव्हा मला दिवसाच्या 15 ओव्हर शिल्लक असताना इनिंग घोषित केली जाईल, असं सांगितलं गेलं, पण फक्त अर्ध्या तासानंतरच मला जलद खेळण्याचा संदेश देण्यात आला. काही वेळानंतर पुन्हा मेसेज आला तेव्हा याच ओव्हरमध्ये द्विशतक पूर्ण कर, कारण द्रविड इनिंग घोषित करणार आहे, असं सांगण्यात आलं. त्यावेळी आमच्याकडे 12 बॉल शिल्लक होते, पण त्या ओव्हरमध्ये मला बॅटिंगच आली नाही. इमरान फरहातच्या बॉलिंगवर युवराज आऊट झाला. आणि पार्थिव पटेल बॅटिंगला आला तेव्हा द्रविडने आम्हाला ड्रेसिंग रूममध्ये बोलावलं. यानंतर मला धक्का बसला कारण ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे मला कमीत कमी एक ओव्हर तरी बॅटिंग मिळायला पाहिजे होती, पण तसं झालं नाही,' असं सचिन त्याच्या आत्मचरित्रात म्हणाला.

शतकाजवळ असलेला द्रविड बॅटिंगसाठी उत्सुक

द्रविड आणि इनिंग घोषित करण्याचा वाद 2004 साली आणखी एकदा झाला होता. सिडनी टेस्टमध्ये (India vs Australia) सचिन तेंडुलकरने 241 रनची खेळी केली होती. भारताने या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 7 विकेट गमावून 705 रन केले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाचा 474 रनवर ऑल आऊटझाला, ज्यामुळे भारताला 231 रनची आघाडी मिळाली. यानंतर भारताने आपली दुसरी इनिंग 211/2 वर घोषित केली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 443 रनचं आव्हान मिळालं.

या सामन्यात भारताने इनिंग लवकर घोषित केली असती, तर भारताच्या बॉलरना मॅच जिंकवून देण्याची संधी मिळाली असती, असं सचिन तेंडुलकरने त्याच्या पुस्तकात लिहिलं आहे. 'मी आणि राहुल चांगली पार्टनरशीप करत होतो, तेव्हा कर्णधार असलेल्या सौरव गांगुलीने दोन-तीन संदेश पाठवले आणि इनिंग कधी घोषित करायची, असं विचारलं. राहुल टीमचा उपकर्णधार होता, त्यामुळे हा निर्णय त्या दोघांचा असेल, असं मी सांगितलं. राहुल द्रविडला आणखी काही वेळ खेळण्यासाठी उत्सुक होता. ब्रेट लीचा बाऊन्सर द्रविडच्या डोक्याला लागल्यानंतर आम्ही इनिंग घोषित केली. तेव्हा द्रविड 91 रनवर आणि मी 60 रनवर खेळत होतो. ती मॅच आठवली की आम्ही आधीच इनिंग घोषित करायला पाहिजे होती,' असं सचिन म्हणाला.

First published:
top videos

    Tags: Rahul dravid, Team india