रांची, 27 जानेवारी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी20 सामना आज होणार आहे. रांचीत आज सायंकाळी सात वाजता सामना सुरू होईल. एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला 3-0 ने लोळवल्यानतंर आता टी20 मालिकेत कामगिरी कायम राखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या टी20 संघात हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि सूर्यकुमार वगळले तर इतर सर्व खेळाडू युवा असणार आहेत.
रांचीतलं मैदान हे फिरकीपटूंसाठी फायद्याचं आहे. गोलंदाजांना ग्रीप आणि टर्न मिळतो. पहिल्या टी20 सामन्यात अशीच खेळपट्टी असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पहिल्या डावात 160 च्या जवळपास धावा होतात तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ सरासरी 110 धावांपर्यंत मजल मारतो.
हेही वाचा : सानिया मिर्झाचं करिअरमधलं सर्वात मोठं स्वप्न अपूर्णच, शेवटच्या मॅचनंतर संयमाचा बांध फुटला निघाले अश्रू
याआधी रांचीच्या मैदानात तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये भारतीय संघाची कामगिरी जबरदस्त आहे. आतापर्यंत तीन टी20 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. हे तीन सामने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झाले होते.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत - शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुड्डा, उमरान मलिक, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह
न्यूझीलंड -
फिन एलन, डेवॉन कॉनवे, मार्क चापमॅन, ग्लेन फिलिप्स, डेरिल मिशेल, मायकल ब्रेसवेल, मिशेल सँटनर, लॉकी फर्ग्यूसन, जेकब डफी, हेन्री शिप्ले, ब्लेअर टिकनर,
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.