मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /INDvsNZ : न्यूझीलंडने अखेरच्या षटकापर्यंत झुंजवले, भारताचा 12 धावांनी विजय

INDvsNZ : न्यूझीलंडने अखेरच्या षटकापर्यंत झुंजवले, भारताचा 12 धावांनी विजय

न्यूझीलंडची अवस्था एकवेळ ६ बाद १३६ अशी झाली असताना मायकल ब्रेसवेलनं वेगवान शतक झळकावत अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली.

न्यूझीलंडची अवस्था एकवेळ ६ बाद १३६ अशी झाली असताना मायकल ब्रेसवेलनं वेगवान शतक झळकावत अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली.

न्यूझीलंडची अवस्था एकवेळ ६ बाद १३६ अशी झाली असताना मायकल ब्रेसवेलनं वेगवान शतक झळकावत अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

हैदराबाद, 18 जानेवारी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने १२ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर न्यूझीलंडला ३५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मायकल ब्रेसवेलच्या वेगवान शतकाच्या जोरावर न्यूझीलंड विजयाच्या जवळ पोहोचला होता. मात्र अखेरच्या षटकात मायकल बाद झाला अन् भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

न्यूझीलंडची अवस्था एकवेळ ६ बाद १३१ अशी झाली होती. मात्र मिशेल सँटनर आणि ब्रेसवेल यांनी सातव्या गड्यासाठी दीडशतकी भागिदीरी केली. सँटनर बाद झाल्यानंतर ब्रेसवेलने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत वेगाने धावा केल्या. पण अखेरच्या षटकात तो पायचित झाला आणि न्यूझीलंडचा डाव ३३७ धावात संपुष्टात आला.

हेही वाचा : वनडेत द्विशतक झळकावण्यात टीम इंडियाचा दबदबा, 13 वर्षांत 10 पैकी 7 भारतीयांच्या नावावर

अखेरच्या षटकात न्यूझीलंडला २० धावांची गरज होती. शार्दुल ठाकुरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून मायकल ब्रेसवेलने भारतावरचं दडपण वाढवलं. तर शार्दुलने दुसरा चेंडू वाइड टाकला. यानतंर तिसऱ्या चेंडूवर शार्दुल ठाकुरने मायकल ब्रेसवेलला पायचित केलं. भारताकडून मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा चार विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकुर आणि कुलदीप यादवने दोन गडी बाद केले. याशिवाय मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

First published:

Tags: Cricket