IND vs ENG: अहमदाबाद पिचबाबत रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

IND vs ENG: अहमदाबाद पिचबाबत रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

भारतानं इंग्लंडचा (IND vs ENG) 10 विकेटनं पराभव केल्यानंतर अहमदाबाद पिचवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या टेस्टमध्ये सर्वात जास्त रन करणारा भारताचा ओपनर रोहित शर्माला (Rohit Sharma) तसं वाटत नाही.

  • Share this:

अहमदाबाद, 26 फेब्रुवारी : भारतानं इंग्लंडचा (IND vs ENG)  10 विकेटनं पराभव केल्यानंतर अहमदाबाद पिचवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तिसरी टेस्ट फक्त दोन दिवसांमध्ये संपली. दुसऱ्या दिवशी तर तब्बल 17 विकेट्स पडल्या. त्यामुळे अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी (Cricket expert) अहमदाबादचं पिच खराब असल्याचं म्हंटलं आहे. या टेस्टमध्ये सर्वात जास्त रन करणारा भारताचा ओपनर रोहित शर्माला (Rohit Sharma) तसं वाटत नाही.

रोहित शर्मानं हे पिच सामान्य असल्याचं म्हंटलं असून या पिचवर खेळण्याची जिद्दीची आवश्यकता असल्याचं सांगितलं आहे. रोहितनं पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. त्याचं श्रेय त्यानं सकारात्मक वृत्तीला दिलं. त्याचबरोबर विशेष बाब म्हणजे आपण फक्त पिचवर टिकून राहण्याचा नाही तर रन काढण्याचा प्रयत्न केला असंही रोहितनं सांगितलं.

अहमदाबाद टेस्टमध्ये रोहित शर्मानं एकमेव अर्धशतक झळकावलं होतं. या टेस्टमध्ये भारतीय स्पिनर्सनी 20 पैकी 19 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचे बॅट्समन अक्षर पटेलची बॉलिंग ओळखण्यात अपयशी ठरले. अक्षर पटेलचा बॉल वळण्याच्या ऐवजी खाली राहत होता त्यामुळे इंग्लंडच्या टीमचा गोंधळ उडाला.

‘या प्रकारच्या पिचवर खेळताना तुमच्यात जिद्द हवी. त्याचबरोबर तुम्ही रन काढण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही बॉल फक्त ब्लॉक करु शकत नाही. काही बॉल टर्नही होत होते. तुम्ही त्या हिशेबानं खेळायला गेला तर काही बॉल खाली राहत होते,’ असं रोहितनं सांगितलं.

रोहितनं पहिल्या डावात 66 रन काढले होते. या खेळीच्या दरम्यान आपण इंग्लंडच्या बॉलर्सपेक्षा दोन पावलं पुढं होतो, असं रोहितला वाटतं. ‘तुम्हाला कधी-कधी पुढाकार घेऊन रन काढण्याची पद्धत शोधली पाहिजे. मी फक्त टिकून राहण्याचा नाही तर रन काढण्याचाही प्रयत्न केला. त्याचबरोबर चांगल्या बॉलचा आदर केला. बस्स, मी फक्त इतकंच करण्याचा प्रयत्न केला,’ असं रोहितनं यावेळी स्पष्ट केलं.

( वाचा :  IND vs ENG : 11 विकेट घेत जगातला सगळ्यात 'घातक' बॉलर बनला अक्षर )

युवराजनं केली टीका

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनं (Yuvraj Singh) मात्र या पिचवर टीका केली आहे. 'फक्त दोन दिवसातच मॅच संपली. हे टेस्ट क्रिकेट आहे का नाही ते माहिती नाही. जरअनिल कुंबळे आणि हरभजनला या प्रकारचे पिच मिळाले असते, तर त्यांच्या एक हजार आणि 800 विकेट असत्या. विजयाबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन. अक्षर पटेलची शानदार बॉलिंग. अश्विन आणि इशांत शर्मालाही शुभेच्छा,' असं ट्वीट युवराज सिंगने केलं आहे

Published by: News18 Desk
First published: February 26, 2021, 9:38 AM IST

ताज्या बातम्या