शुभमन गिलने रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये पंजाबकडून खेळताना मध्य प्रदेशविरुद्ध 9 आणि 19 रन केले होते, पण त्याचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं रेकॉर्ड चांगलं आहे. 34 मॅचच्या 59 इनिंगमध्ये त्याने 55 च्या सरासरीने 2,856 रन केले आहेत, यात 7 शतकं आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. 268 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. टीम इंडियाकडून गिलने 10 टेस्टमध्ये 33 च्या सरासरीने 558 रन केले, यात 4 अर्धशतकं आहेत. 91 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे, त्यामुळे गिलचं लक्ष्य पहिल्या शतकाकडे असेल. तीन वेळा अर्धशतकी पार्टनरशीप रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 13 इनिंगमध्ये ओपनिंग केली, यात त्यांनी 35 च्या सरासरीने 424 रन केले. या दोघांमध्ये तीन वेळा अर्धशतकीय पार्टनरशीप झाली. 71 रन ही रोहित आणि गिल यांच्यातली सर्वात मोठी पार्टनरशीप होती. टीम इंडिया टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने आघाडीवर असली तरी त्यांना इंग्लंडकडून कडवी झुंज मिळण्याची शक्यता आहे. एशेसमध्ये लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर इंग्लंडने कर्णधार आणि कोच बदलले आहेत. जो रूटने कॅप्टन्सीचा राजीनामा दिला, त्यानंतर बेन स्टोक्सला कर्णधार करण्यात आलं, तर ब्रॅण्डन मॅक्कलमच्या रुपात टीमला आक्रमक कोचही मिळाल आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या पहिल्या 2 मॅच जिंकून इंग्लंडने टेस्ट क्रिकेटचा नवा ब्रॅण्ड दाखवून दिला आहे. भारतीय टेस्ट टीम रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, ऋषभ पंत, श्रीकर भरत, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णाView this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Team india