मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Manchester टेस्टबाबत गावस्करांची महत्त्वाची प्रतिक्रिया- '2008 मुंबई हल्ल्यावेळी इंग्लंडचा निर्णय भारतीयांनी विसरू नये'

Manchester टेस्टबाबत गावस्करांची महत्त्वाची प्रतिक्रिया- '2008 मुंबई हल्ल्यावेळी इंग्लंडचा निर्णय भारतीयांनी विसरू नये'

ईसीबीचा तो निर्णय भारतीयांनी कधीही न विसरण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी विक्रमवीर क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दिली आहे..

ईसीबीचा तो निर्णय भारतीयांनी कधीही न विसरण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी विक्रमवीर क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दिली आहे..

ईसीबीचा तो निर्णय भारतीयांनी कधीही न विसरण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी विक्रमवीर क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दिली आहे..

मुंबई, 11 सप्टेंबर: भारत आणि इंग्लंड या संघांदरम्यान सुरू असलेला पाचवा क्रिकेट सामना तो सुरू होण्याच्या अवघ्या दोन तास आधी रद्द करण्यात आला. भारतीय टीमचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांना कोरोना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झाल्यामुळे ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार असलेला हा सामना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला. रद्द झालेला हा सामना पुन्हा नव्याने आयोजित करण्याचा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंड क्रिकेट मंडळापुढे (ECB) ठेवला आहे. दोन्ही मंडळांचे संबंध घनिष्ठ असून, त्यामुळे हा सामना पुढे कधी खेळवायचा याबद्दल दोन्ही संघांच्या समन्वयाने ठरवलं जाईल, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.

भारताचे माजी विक्रमवीर क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 2008 साली मुंबईवर दहशतवादी हल्ला (Mumbai Terrorist Attack) झाल्यानंतर इंग्लंड टीमला (England Team) दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं होतं; मात्र ईसीबीने दोन महिन्यांनंतर इंग्लंड टीमला तो दौरा पूर्ण करण्यासाठी भारतात पुन्हा पाठवलं होतं. ईसीबीचा तो निर्णय भारतीयांनी कधीही न विसरण्यासारखा होता, असंही सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.

हे वाचा-IPL पूर्वी शाहरूख खानच्या टीमचा बोलबाला, पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर धडक

भारत आणि इंग्लंड टीम्सदरम्यान पाचवी टेस्ट मॅच शुक्रवारी, 10 सप्टेंबरपासून सुरू होणार होती. काही दिवसांपूर्वी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर आता असिस्टंट फिजिओ योगेश परमार (Yogesh Parmar) यांना कोरोना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे टीममधल्या कोणा खेळाडूंनाही संसर्ग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच त्यांना संसर्ग होऊ नये याची काळजी घेण्यासाठी ही मॅच अगदी ऐन वेळी रद्द करण्यात आली. ही मॅच रिशेड्यूल (Reschedule Match) करण्याबद्दलचा प्रस्ताव बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला पाठवला आहे. त्या प्रस्तावाचं सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी स्वागत केलं आहे.

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा इंग्लंड क्रिकेट टीम भारतात होती. सात वन डे मॅचेसच्या सीरिजमधल्या गुवाहाटी (29 नोव्हेंबर) आणि दिल्ली (2 डिसेंबर) इथे होणार असलेल्या शेवटच्या दोन मॅचेस रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोन टेस्ट मॅचेसच्या सीरिजसाठी इंग्लंडची टीम दोन महिन्यांनी पुन्हा भारतात आली होती. शेवटची टेस्ट मॅच मुंबईत होणार होती; मात्र ती चेन्नईत खेळवण्यात आली होती.

हे वाचा-टीममध्ये निवड न झाल्यानं दिग्गज खेळाडू नाराज, बोर्डावर केला गंभीर आरोप

सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, '2008च्या भयंकर दहशतवादी हल्ल्यांनंतर इंग्लंडची टीम पुन्हा खेळण्यासाठी भारतात आली होती, हे आपण भारतीयांनी कधीच विसरता कामा नये. तेव्हा ती टीम न येण्याचा निर्णय घेऊच शकली असती; मात्र तत्कालीन कॅप्टन केव्हिन पीटरसनने घेतलेल्या भूमिकेमुळे आणि त्याने त्यांच्या टीममधल्या सर्वांची समजूत घातल्यामुळे ती टीम पुन्हा आली. चेन्नईत खेळल्या गेलेल्या त्या टेस्ट मॅचच्या पाचव्या दिवशी भारताने 380 रन्सचा पाठलाग करून विजय मिळवला होता.'

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा त्या वेळचा निर्णय आपण कधीही विसरता कामा नये. म्हणूनच बीसीसीआयने आत्ता ठेवलेला प्रस्ताव योग्य आहे. रद्द झालेली ही टेस्ट मॅच इंग्लंड टीमच्या पुढच्या वर्षीच्या मर्यादित ओव्हर्सच्या मॅचसाठीच्या दौऱ्यावेळी खेळवता येऊ शकते, असंही गावस्कर यांनी सुचवलं आहे.

First published:

Tags: IND Vs ENG, Sunil gavaskar