मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : टीम इंडियात ओपनर निवडीचा वाद, गांगुलीने दिली पहिली प्रतिक्रिया

IND vs ENG : टीम इंडियात ओपनर निवडीचा वाद, गांगुलीने दिली पहिली प्रतिक्रिया

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या शुभमन गिल (Shubhaman Gill) याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो भारतात परतणार आहे. यानंतर टीम इंडियाने (Team India) दोन ओपनरची मागणी केली, पण निवड समितीने याबाबत कोणतीही भूमिका न घेतल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 जुलै : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या शुभमन गिल (Shubhaman Gill) याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो भारतात परतणार आहे. यानंतर टीम इंडियाने (Team India) दोन ओपनरची मागणी केली, पण निवड समितीने याबाबत कोणतीही भूमिका न घेतल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या सगळ्या वादावर बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय निवड समितीशी जोडला गेला आहे, असं सौरव गांगुली म्हणाला.

भारतीय टीमने मॅनेजर गिरीश डोंगरे यांच्यामार्फत 28 जूनला गिलऐवजी दोन ओपनर पाठवण्याची मागणी केली होती. या मेलमध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Paddikal) यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली होती, पण निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी दोन दिवसांपूर्वी पर्यंत या मेलला कोणतंही औपचारिक उत्तर दिलं नाही, कारण आधीपासूनच इंग्लंडमध्ये चार ओपनर आहेत.

गांगुलीने त्याच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांशी संवाद साधला. पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल हे दोन्ही ओपनर सध्या श्रीलंकेत आहेत. भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजमध्ये शिखर धवन (Shikhar Dhawan) टीमचं नेतृत्व करणार आहे. तर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय टीम 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्टची सीरिज खेळणार आहे.

आयपीएलचं आयोजन सप्टेंबर महिन्यामध्ये युएईत यशस्वी होईल, असंही गांगुलीने सांगितलं. तसंच सगळ्यांचं हित लक्षात घेऊन टी-20 वर्ल्ड कप भारताऐवजी युएईमध्ये खेळवण्यात येईल. मागच्यावर्षी टी-20 वर्ल्ड कप कोरोनामुळे रद्द करण्यात आला. यावेळचा वर्ल्ड कपही रद्द झाला तर खेळाचं मोठं नुकसान झालं असतं, त्यामुळे आम्ही सुरक्षित स्थळी स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला, असं गांगुली म्हणाला.

First published:

Tags: India vs england, Sourav ganguly, Team india, Virat kohli