मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : ओव्हलमध्ये मैदानात उतरताच अंडरसनने मोडला सचिनचा विक्रम

IND vs ENG : ओव्हलमध्ये मैदानात उतरताच अंडरसनने मोडला सचिनचा विक्रम

जेम्स अंडरसनचा वर्ल्ड रेकॉर्ड

जेम्स अंडरसनचा वर्ल्ड रेकॉर्ड

इंग्लंडचा दिग्गज फास्ट बॉलर जेम्स अंडरसनने (James Anderson) भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला मागे टाकलं आहे.

लंडन, 2 सप्टेंबर : इंग्लंडचा दिग्गज फास्ट बॉलर जेम्स अंडरसन (James Anderson) याच्या नावावर अनेक विक्रमाची नोंद आहे. भारताविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये मैदानात उतरताच अंडरसनने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला अंडरसनने मागे टाकलं आहे. मायदेशामध्ये सर्वाधिक टेस्ट खेळण्याचा विक्रम जेम्स अंडरसनच्या नावावर झाला आहे. लंडनच्या ओव्हल मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथी टेस्ट लंडनच्या ओव्हल मैदानात सुरू आहे. या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.

जेम्स अंडरसन त्याची 166 वी टेस्ट खेळत आहे, घरच्या मैदानातली ही त्याची 95 वी टेस्ट मॅच आहे. याआधी सचिन तेंडुलकरने भारतात सर्वाधिक 94 टेस्ट खेळल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पॉण्टिंगने ऑस्ट्रेलियात 92 टेस्ट खेळल्या.

इंग्लंडचा माजी कर्णधार एलिस्टर कूक (Alistair Cook) आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ (Steve Waugh) यांनी घरत्या मैदानात प्रत्येकी 89-89 टेस्ट खेळल्या. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिस (Jack Kallis) याने घरी 88 टेस्ट खेळल्या.

चौथ्या टेस्टमध्ये भारत आणि इंग्लंडने टीममध्ये दोन बदल केले आहेत. भारताने इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि मोहम्मद शमीच्या (Mohammad Shami) ऐवजी उमेश यादव (Umesh Yadav) आणि शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संधी दिली आहे. तर इंग्लंडच्या टीममध्ये जॉस बटलर आणि सॅम करनच्याऐवजी ओली पोप आणि क्रिस वोक्स आहेत. पाच टेस्ट मॅचची ही सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे.

First published:

Tags: India vs england, James anderson, Sachin tendulkar