लंडन, 16 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England 2nd Test) ऐतिहासिक विजय झाला. भारताने दिलेल्या 272 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा 120 रनवर ऑल आऊट झाला. जेम्स अंडरसनला (James Anderson) शून्य रनवर मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) बोल्ड केल्यानंतर टीम इंडियाने जोरदार सेलिब्रेशन केलं. अंडरसनची विकेट घेतल्यानंतर मोहम्मद सिराज स्टम्प घेऊन पळाला. लॉर्ड्सच्या ड्रेसिंग रूममधूनही टीम इंडियाच्या सहकाऱ्यांनी उड्या मारून जल्लोष केला.
OUT! TEAM INDIA HAS WON WITH 8 OVERS TO SPARE! 🇮🇳
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 16, 2021
India take 1-0 lead in the series 🙌🏽
Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #ENGvIND #Siraj pic.twitter.com/XDathfvy6G
लॉर्ड्स टेस्टमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी मिळवली. भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी टेस्ट आता 25 ऑगस्टपासून लीड्समध्ये सुरू होणार आहे. भारताने ठेवलेल्या 272 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीपासूनच धक्के बसले. शून्य रनवर इंग्लंडचे दोन्ही ओपनर रोरी बर्न्स आणि डॉमनिक सिबली आऊट झाले. यानंतर जो रूटने हसीब हमीदसोबत इंग्लंडची पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला, पण इशांत शर्माने (Ishant Sharma) पहिले हमीद आणि मग जॉनी बेयरस्टोला आऊट केलं. अखेरच्या सत्रामध्ये भारताला विजयासाठी 6 विकेटची गरज होती. भारताने या सगळ्या 6 विकेट घेत दणदणीत विजय मिळवला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराहला 3, इशांत शर्माला 2 आणि मोहम्मद शमीला 1 विकेट मिळाली.