मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Manchester Test : भारताच्या खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट आले, पाचव्या टेस्टची Update

Manchester Test : भारताच्या खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट आले, पाचव्या टेस्टची Update

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या मॅनचेस्टर टेस्टबाबतची (India vs England 5th Test) सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या मॅनचेस्टर टेस्टबाबतची (India vs England 5th Test) सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या मॅनचेस्टर टेस्टबाबतची (India vs England 5th Test) सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे.

  • Published by:  Shreyas

मॅनचेस्टर, 9 सप्टेंबर : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या मॅनचेस्टर टेस्टबाबतची (India vs England 5th Test) सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाच्या सगळ्या खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह (Corona Test Negative) आली आहे, त्यामुळे आता पाचव्या टेस्टचा मार्ग मोकळा झाला आहे. ईएसपीएन-क्रिकइन्फोने याबाबतचं वृत्त दिलं आहे. भारतीय टीम सध्या या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाचे ज्युनियर फिजिओ योगेश परमार यांची कोरोना टेस्ट बुधवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आली. यानंतर मॅनचेस्टर टेस्ट आणि आयपीएलबाबत (IPL 2021) बीसीसीआय (BCCI) चिंतेत आलं.

योगेश परमार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाचे सगळे खेळाडू हॉटेलमध्येच क्वारंटाईन झाले, तसंच त्यांनी सरावही रद्द केला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट शुक्रवारपासून सुरु होणार आहे. तसंच ही टेस्ट संपल्यानंतर दोन्ही टीमचे खेळाडू चार्टर विमानाने आयपीएल खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहेत. योगेश परमार यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मात्र बीसीसीआयमध्ये चिंतेचं वातावरण होतं, पण आता सगळ्या खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे ही चिंता मिटली आहे.

दुसरीकडे दिवसभर पाचव्या टेस्टबाबत अनिश्चिततेचे ढग दाटलेले असतानाच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केलेल्या धक्कादायक मागणीमुळेही वाद ओढावला होता. योगेश परमार यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारताने पाचव्या टेस्टमधून माघार घ्यावी आणि सीरिज 2-2 ने बरोबरीत सोडवावी, अशी ऑफर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला दिली होती. यानंतर बीसीसीआयने विराट कोहली आणि रोहित शर्माशी संपर्क साधला, पण या दोघांनी ही ऑफर धुडकावून लावली, तसंच दोघांनी नाराजीही व्यक्त केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

न खेळताच पराभव स्वीकारा, इंग्लंडच्या ऑफरवर विराट-रोहित भडकले!

5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. पहिली टेस्ट मॅच ड्रॉ झाल्यानंतर लॉर्ड्सवर झालेली दुसरी टेस्ट भारताने जिंकली, तर तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडने पुनरागमन केलं. यानंतर ओव्हलमध्ये झालेली चौथी टेस्ट भारताने जिंकली.

First published:

Tags: India vs england, Rohit sharma, Virat kohli