नॉटिंघम, 10 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात (India vs England 3rd T20) सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav Century) वादळी शतक झळकावलं. सूर्याच्या या शतकानंतरही टीम इंडियाला हा सामना जिंकता आला नाही. इंग्लंडने दिलेल्या 216 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 198/9 पर्यंतच मजल मारता आली. सूर्यकुमार यादवने 212.73 च्या स्ट्राईक रेटने 55 बॉलमध्ये 117 रन केले. त्याच्या या खेळीमध्ये 14 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. सूर्यकुमार यादवने त्याच्या या खेळीमध्ये 360 डिग्री शॉट मारले.
इंग्लंडने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला चांगल्या सुरूवातीची गरज होती, पण 31 रनवरच भारताने तीन विकेट गमावल्या. ऋषभ पंत 1 रनवर तर विराट आणि रोहित प्रत्येकी 11-11 रन करून माघारी परतले. तीन विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी 61 बॉलमध्ये 119 रनची पार्टनरशीप केली, पण सगळं आक्रमण एकट्या सूर्यानेच केलं.
सूर्यकुमार यादवसोबतच्या शतकी पार्टनरशीपमध्ये श्रेयस अय्यरने 23 बॉलमध्ये 2 फोरच्या मदतीने 28 रन केले. एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना श्रेयस अय्यरने फक्त 121.74 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, याचा फटका टीम इंडियाला बसला. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवची विकेट गेल्यानंतर भारताची बॅटिंग पुन्हा एकदा गडगडली.
तीन टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाचा पहिल्या दोन मॅचमध्ये विजय झाला होता, त्यामुळे त्यांनी सीरिज आधीच जिंकली होती. तिसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाने चार बदल केले होते. हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांच्याऐवजी श्रेयस अय्यर, आवेश खान, उमरान मलिक आणि रवी बिष्णोई यांना संधी देण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.